BANNER

The Janshakti News

जालना किंवा बीड लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आग्रह...

=====================================
        =============================

सांगली : वार्ताहर             दि. ११ मार्च २०२४

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना किंवा बीड लोकसभा निवडणूक लढावावी , स्वाभिमानि शेतकरी संघटना बिनशर्त पाठींबा देईल असे पत्र त्यांना देण्यात आले आहे अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
खराडे म्हणाले मनोज जरागे पाटील हे गेली अनेक वर्षे मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत त्यांच्या लढ्यामुळेच कुणबी मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. राज्यात 53 लाख मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार आहे हे फार मोठे यश आहे.

रस्त्यावर लढाई, रस्त्यावर संघर्ष करणारे संघर्ष योद्धे संसदेत ही असले पाहिजेत ही आमची भूमिका आहे.

आदरनीय राजू शेट्टी व प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांच्याशी चर्चा करून त्यांना पाठींबा देणारे पत्र देण्यात आले आहे.

यावेळी त्यांना आम्ही आग्रह धरला कि मराठा समाजाचे अन्य प्रश्न मार्गी लावण्या बरोबरच आरक्षणाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसद हाच अंतिम मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही संसदेत गेले पाहिजे तुम्ही तुमच्या भूमिकेवर पुनर्वीचार करावा असा आग्रह धरला.

त्यावर त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली.

यावेळी स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे , बीड चे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले , राजेंद्र भाऊ पाटील , भुजंग काका पाटील , सुरज पाटील , सुरेश पचिंबरे , दत्ता भोसले , अंकु्श तारख आदिसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना किंवा बीड लोकसभा निवडणूक लढवावी स्वाभिमानी बिन शर्त पाठिबा देईल असे पत्र त्यांना देताना महेश खराडे व आदी 

हेही पहा ----

 

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags