BANNER

The Janshakti News

आ. अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन..


=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर दि.१० मार्च २०२४

अवजड वाहने गावात येऊन अडथळा करतील म्हणून दूरदृष्टीने स्वर्गीय क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापूंनी गावाभोवती रिंग रोडची संकल्पना आणली. यामुळे गावातील अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

असे मत आमदार अरुणअण्णा लाड यांनी व्यक्त केले ते कुंडल (ता.पलूस) येथे रिंगरोड पासून ते ब्रम्हानंद मंदिर रस्त्याच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार प्रमुख उपस्थित होते.
त्याच बरोबर पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण पवार यांच्या पंधराव्या वित्त आयोगातून गावातील कपिलेश्वर मंदिरा नजीक वॉटर एटीएमचे उद्धाटन करून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी माजी उपसभापती अरुण पवार, अशोक खारगे, मुकुंद जोशी, अनिल पवार, अशोक विभूते, पंजाब पवार, संजय मदने, कुंडलिक एडके, सदस्य राहुल पवार,मनीषा लाड, सुगंधा एडके, रेखा मदने, विजया सावत, रामचंद्र बाबर, माजी सभापती अरुण पवार, माजी उपसरपंच मनोज पवार, प्रगतशील शेतकरी संजय आवटे यांचेसह नागरिक उपस्थित होते.


रस्ता कामाचे उदघाटन करताना आमदार अरुणअण्णा लाड, किरण लाड, शरद लाड, जयराज होवाळ, अर्जुन कुंभार, अरुण पवार आदी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags