yuva MAharashtra या सरकारला आपल्या जनतेच्या विचारांना मोडून राज्य करायचे आहे, जसं इंग्रजांनी केलं अगदी तसं..! डॉ.विश्वंभर चौधरी

या सरकारला आपल्या जनतेच्या विचारांना मोडून राज्य करायचे आहे, जसं इंग्रजांनी केलं अगदी तसं..! डॉ.विश्वंभर चौधरी



======================================
======================================

कुंडल : वार्ताहर     दि. १३ फेब्रुवारी २०२४

देशात दोनच प्रकारचे लोक आहेत एक म्हणजे मोदींना मानणारे आणि दुसरा म्हणजे मोदींना न मानणारे त्यामुळे तिसऱ्या आघाडीची निडणुकीत डाळ शिजेल असे वाटत नाही असे उद्गार डॉ.विश्वंभर चौधरी यांनी काढले

ते कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला भेटी दरम्यान बोलत होते. यावेळी अध्यक्ष शरद लाड यांनी त्यांचे स्वागत केले.

चौधरी म्हणाले, देशात इंडिया आघाडीची परिस्थिती चांगली आहे. अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिला त्या अगोदर आम्ही एका कार्यक्रमात होतो पण असे करतील असा आम्हाला अजिबात नव्हता. या त्यांच्या निर्णयामुळे असे दिसते की काँग्रेसने शस्त्रे टाकली आहेत पण या सगळ्या वादळात खासदार शरद पवार मात्र हल्ले होऊनही त्याच्या जागी स्थिर राहून पुरून उरले आहेत. त्यांचा काँग्रेसी विचार असल्याने ही ताकद त्यांच्यात आली. यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्यात विचार रुजवण्यासाठी तीन महिन्यातून एखादे शिबिर घ्यावे यातून राज्यघटनेपासूनचे ज्ञान आजच्या युवकांना दिले तर पुरोगामी कार्यकर्ते घडतील आणि यासाठीच आम्ही " निर्भय बनो" हे अभियान राबवित आहोत.

मोदींनी प्रभू रामचंद्र वैयक्तिक केले यातून त्यांचा स्वार्थ दिसतो कारण काही दिवसांपूर्वी आमच्या गाडीवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यातील एका युवकाला मी म्हटलो, तुमची इच्छा आहे ना मी सभेला जाऊ नये..! ठीक आहे नाही जात, फक्त मला कोणीही "रामरक्षा" म्हणून दाखवा मी इथूनच मागे फिरतो. पण दुर्दैव असे की एकाही युवकाला ती येत नव्हती मग ज्यांना रामरक्षाच येत नाही त्यांना प्रभू रामचंद्र कळणार कसे. याचा अर्थ असा की, या सरकारला आपल्या जनतेच्या विचारांना मोडून राज्य करायचे आहे, जसं इंग्रजांनी केलं अगदी तसं..! पण आम्ही ते कदापि होऊ देणार नाही असा घणाघात त्यांनी आपल्या बोलण्यातून या सरकारवर केला.

तुमच्या चळवळीला कसलीही मदत लागो आम्हाला कधीही हाक मारा या चळवळीत आम्ही नक्की सहभागी होऊ असा शब्द शरद लाड यांनी डॉ. विश्वंभर चौधरी यांना दिला.

डॉ.विश्वंभर चौधरी यांचे स्वागत करताना शरद लाड.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆