BANNER

The Janshakti News

भिलवडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांना राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच अवॉर्ड ;


जायंट्स ग्रुप , व्यापारी संघटना , आप्पासाहेब चोपडे पतसंस्थेच्या वतीने सत्कार 


======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर       दि. १३ फेब्रुवारी २०२४

पलूस तालुक्यातील भिलवडी गावचे सुपुत्र व सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारीसो मा. मोहनराव गायकवाड  यांचा राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच अवॉर्ड मिळाले बद्दल  जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी, व्यापारी संघटना भिलवडी व  डॉ. आप्पासाहेब चोपडे पतसंस्थेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न झाला.

 सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला ' माझी शाळा आदर्श शाळा,  अर्थात मॉडेल स्कूल हा उपक्रम राज्यभर नव्हे तर देशभर गाजला. याचीच दखल घेऊन दिल्ली येथे सांगली जिल्हा परिषदेला राष्ट्रीय स्कॉच अवार्डने गौरविण्यात आले. हा अवॉर्ड दिल्ली येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री मोहनराव गायकवाड  व सी एम फेलो श्री ऋषिकेश गरुड यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती तृप्ती धोडमसे यांच्या वतीने स्वीकारला.


या कार्यक्रमासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व जायन्टस ग्रुपचे अध्यक्ष  श्री सुबोध वाळवेकर,  उपाध्यक्ष श्री महावीर चौगुले, सतीश चौगुले, सुनील परीट, रणजीत पाटील, गजानन चौगुले, उल्हास ऐतवडे, राजेंद्र तेली, बाळासाहेब पाटील, निवास गुरव,संभाजी महिंद, राजन कुलकर्णी,शंकर केंगार,   के आर पाटील, मनोज चौगुले,  विशाल सावळवडे त्याचप्रमाणे व्यापारी संघटनेचे व जायंट्स ग्रुपचे  पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार श्री प्रदीप माने यांनी मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆