BANNER

The Janshakti News

पोलिस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही====================================
==============================

सांगली : द जनशक्ती न्यूज         दि. 2 फेब्रुवारी 2024

यंदाचं वर्ष हे निवडणुकांच्या रणधुमाळीचे आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांना सक्षमपणे पार पाडावी लागणार आहे. यामध्ये पोलिस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही? असा विश्वास नव्यानेच सांगलीच्या पोलिस अधीक्षकपदी आलेले संदिप घुगे यांनी व्यक्त केला. सामान्यांच्या मनात पोलिसांबाबत चांगली प्रतिमा कशी राहिल, यादृष्टीकोनातून सर्वच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आदेशही त्यांनी दिले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆