BANNER

The Janshakti News

इतिहासाचे पुनर्लेखन हे काळाची गरज..डॉ. आ.ह. साळुंखे


=====================================
=====================================


कुंडल : वार्ताहर            3 फेब्रुवारी 2024

इतिहासाचे पुनर्लेखन हे काळाची गरज आहे आणि ते पुनर्लेखन हे सत्याला प्रमाण मानून होणे गरजेचे आहे. असे मत प्राध्यापक डॉ. आ.ह. साळुंखे यांनी मांडले.

ते कुंडल (ता.पलूस) येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ व क्रांतिअग्रणी डॉ. जी डी बापू लाड महाविद्यालय आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अरुणअण्णा लाड उपस्थित होते. जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड प्रमुख उपस्थित होते.

आ.ह.साळुंखे म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंशी असलेले ऋणानुबंध मला नेहमी काम करण्याची प्रेरणा देतात. भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे जे लेखन झालं आहे ते पुनर्लेखन झालं पाहिजे. पुनर्लेखन मध्ये दोन प्रवाह असतात त्यामध्ये अलंकारीकता असण्याची शक्यता आहे. इतिहासातिल त्रुटी मग त्या अनावधानाने असोत की जाणीवपूर्वक त्या दूर व्हायच्या असतील तर त्याचे पुनर्लेखन होणे गरजेचे आहे. या पुनर्लेखनाने समाजाचा समतोल साधला जाऊ शकतो. इतिहास हा सर्वसमावेशक भाषेत असणे जितके आवश्यक आहे तितकेच पुनर्लेखन ही असावे. आपली मराठी संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की अनेक संतांचे अभंग शीख समुदायाच्या धर्म ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे समग्र इतिहास मराठी साहित्याच्या माध्यमातून समोर यावा यासाठी असे पुनर्लेखन एक काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय स्थानावरून आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, 
इतिहास अभ्यासल्याशिवाय भविष्यात पावले टाकता येत नाही यासाठी वस्तुनिष्ठ इतिहास असणे गरजेचे आहे. जो इतिहास आहे त्यात सामान्यांना स्थान हे खूप थोडे दिले आहे. जे वाङ्ममय मांडले ते ही वस्तुनिष्ठरित्या पुढे आणले पाहिजे. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंना वस्तुनिष्ठता आवडायची आणि ते आयुष्यभर वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी झटले. वाङ्ममयातून अभ्यासूपणे इतिहास पुढे यावा याचेच या चर्चासत्रात विवेचन व्हावे. यातून देशाला आणि नवीन पिढीला वस्तुनिष्ठ इतिहास मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
   

कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉ.आर.एस.डुबल यांनी केले, प्रास्ताविक डॉ.धनंजय होनमाणे यांनी केले तर आभार डॉ. नवनाथ गुंड यांनी मानले.

यावेळी डॉ. लीला जोशी, डॉ.रमेश पोळ, डॉ.भरत जाधव, कॉ. बाबुराव गुरव, व्ही.वाय.पाटील, डॉ. रणधीर शिंदे, गौतमीपुत्र कांबळे, डॉ. डी. ए. देसाई, डॉ. रघुनाथ केंगारकर, डॉ. प्रकाश कुंभार, सर्जेराव पवार, कॉ. संपतराव पवार यांचेसह प्राध्यापक, विद्यार्थी, चर्चासत्रातिल अभ्यासक उपस्थित होते.



मराठी वाड्मय इतिहासाचे पुनर्लेखन" या विषयावर आयोजित आतंरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी बोलताना प्रा.डॉ. आ. ह. साळुंखे, बाजूस आमदार अरुणअण्णा लाड.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags