BANNER

The Janshakti News

पलूस : नायब तहसिलदार व पुरवठा विभागाचा मनमानी कारभार तात्काळ थांबवा... आर.पी.आय च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन...=====================================
=====================================

पलूस वार्ताहर :   दि. २४ फेब्रुवारी २०२४

  पलूस तहसील कार्यालयामध्ये महसूल अधिका-यांचा सुरु असलेला भोंगळ कारभार तात्काळ थांबवावा या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दि.२३ फेब्रुवारी रोजी पलूसचे तहसीलदार  दिप्ती रिटे यांना देण्यात आले. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे युवा आघाडी पलूस तालुका अध्यक्ष अविराज काळेबाग यांनी दिली.


 निवेदनात असे म्हटले आहे की, नायब तहसिलदार श्री. मनोहर पाटील हे तहसील कार्यालयात कामानिमित्त येणा-या नागरिकांशी उद्दटपणे वागत आहेत. जनतेची कामे करताना दिरंगाई करीत आहेत. जातीचे दाखले देताना नको त्या अटी घालून विनाकारण दाखले थांबवत आहेत त्यामुळे नायब तहसीलदार यांच्यावर अंकुश ठेवा..
 त्याचबरोबर पुरवठा विभागात राशन कार्डातील नाव कमी करणे , नवीन व दुबारा  रेशनकार्ड देणे , रेशन कार्ड फोड करणे अशी कामे तत्काळ होत नाहीत. त्यामुळे  नायब तहसिलदार यांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यात यावा व पुरवठा विभागातील कारभार सुधारावा , अन्यथा हा कारभार सुधारण्यासाठी व नायब तहसिलदारांच्या बदलीसाठी  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक आघाडी तालुकाध्यक्ष अविराज काळेबाग , उपाध्यक्ष यशबाबा ऐवळे , सांगली जिल्हा माजी अध्यक्ष राजेश तिरमारे ,  कडेगाव तालुकाध्यक्ष विजय गवाळे , सागर भाऊ कांबळे , योगेश दोडके यांच्या सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆