BANNER

The Janshakti News

शरद आत्मनिर्भर मार्फत पलूस येथे मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न...


=====================================
=====================================

पलूस वार्ताहर : ता.२४ फेब्रुवारी २०२४

शरद फाऊंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव व श्री टेके आय क्लिनिक सांगली यांचे संयुक्त विद्यमाने पलूस शहरामध्ये मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते.
या शिबिराचे उदघाटन पुणे पदवीधर आमदार मा. श्री. अरुण (अण्णा) लाड यांचे हस्ते करणेत आले. या शिबिरामध्ये सुरवातीपासूनच भरपूर मोठ्या प्रमाणात रुग्णांची उपस्थिती होती. तसेच आमदार अरुण लाड यांनी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सदर शिबिरामध्ये ५०० हून अधिक रुग्णांची तपासणी करणेत आली व १०० हून अधिक रुग्णांना मोफत नेत्र शस्त्रक्रिया करणेसाठी टेके आय क्लिनिक सांगली येथे पाठविण्यात आले.

क्रांति अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा.श्री.शरद भाऊ लाड व क्रांती महिला प्रतिष्ठान च्या अध्यक्षा मा.सौ.धनश्रीताई लाड यांच्या मार्गदर्शनाखाली शरद आत्मनिर्भर अभियान अतिशय जोमाने काम करीत असून शासनाच्या विविध योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा मानस या अभियानाद्वरे आपण करीत आहोत असे मा.शरद भाऊ लाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या अभियानाद्वरे रक्तदान शिबिर आयोजित करून गरजूंना मोफत रक्त पुरवठा केला जातो. तसेच विविध आजारावरील आरोग्य तपासणी शिबिर व उपचार, संजय गांधी निराधार पेन्शन योजना, कलाकार पेन्शन योजना, बाल संगोपन पेन्शन योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अशा अनेक प्रकारची कामे या अभियानाद्वारे सुरू असलेबाबत क्रांती महिला प्रतिष्ठान पलूस - कडेगांव व शरद फाउंडेशन च्या अध्यक्षा मा . सौ. धनश्री ताई लाड यांनी सांगितले... तसेच पलूस - कडेगांव मतदार संघातील सर्व गरजूनी वरील गोष्टींचा लाभ घेणेत यावा असे आवाहन त्यांनी केले..


या कार्यक्रमासाठी क्रांती सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन श्री.दिगंबर दादा पाटील, पी एस अण्णा माळी, प्राध्यापक आनंदराव निकम सर, रावसो गोंदील,नंदकुमार पाटील, राहुल जगताप, सागर मुदगल, किशोर माळी, गोरख सूर्यवंशी, दीपक मदने, विनायक महाडिक, स्वप्नील पाटील, दिलीप पाटील, सुनिल पाटोळे, विकास पाटील, प्रतीक पाटील हे उपस्थित होते.

हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags