BANNER

The Janshakti News

सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रम विविध उपक्रमाने संपन्न ...


=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर     दि. २८ फेब्रुवारी २०२४ 

सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रम विविध उपक्रमाने संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते प्रारंभी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे सर यांनी स्वागत प्रास्ताविक केले गिरीश चितळे यांचे हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


 यावेळी चितळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी सेजल बाबर अवंतिका स्वामी हेमा सुपनेकर श्वेता रांजणे साक्षी मोरे या विद्यार्थिनींच्या सह श्रीयुत हरा जोशी सुभाष कवडे यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले यावेळी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी लुप्त होत चाललेल्या शब्दांची जपणूक करावी असे आवाहन गिरीश चितळे यांनी केले श्रीयुत हरा जोशी यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा मागवा घेतला सुभाष कवडे यांनी अनेक मराठी शब्द सांगून मराठी भाषा कशी समृद्ध आहे ते स्पष्ट केले आणि ही समृद्धी वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.


 यावेळी गिरीश चितळे यांना संजय घोडावत विद्यापीठाचा आयकॉन पुरस्कार मिळाले बद्दल वाचनालयाचे वतीने कार्यवाह सुभाष कवडे यांनी ग्रंथ भेट देऊन गिरीश चितळे यांचा सत्कार केला यांनी आभार मानले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे प्राध्यापक डॉक्टर शिंदे प्राध्यापक डॉक्टर विनोद कर विश्वस्त जी जी पाटील वाचनालयाचे सर्व सेवक व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी डी आर कदम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

हेही पहा ----


भिलवडी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष विद्यमान सरपंच सौ.विद्याताई सचिन पाटील यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक ----

मा.श्री.भाऊसाहेब रुपटक्के (संपादक , द जनशक्ती न्यूज) व मा.श्री. सचिन आप्पासो पाटील (माजी सदस्य ग्रामपंचायत भिलवडी) ता.पलूस जि.सांगली 


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags