BANNER

The Janshakti News

3 जणांना बेदम मारहाण ; १ जण गंभीर जखमी ; ९ जणांवर गुन्हा दाखल ; ८ आरोपींना अटक...


=====================================

======================================भिलवडी : वार्ताहर     दि. 28 फेब्रुवारी 2024

पलूस तालुक्यातील माळवाडी येथे सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री पावनेदहा वाजण्याच्या सुमारास ९ जणांच्या समुदयाने लक्ष्मी मंदिर परिसरात ३ तरुणांना लाथाबुक्यानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून जखमी तरुणाला सांगली येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत भिलवडी पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार ,
यातील आरोपी राहुल बाळू मोटकट्टे याची आज्जी गेले ३ दिवसापुर्वी मयत झाली होती.मयत महिलेची अंत्यविधीची राख चाळण्यासाठी विश्वास पाटील याचा मामा कृष्णात ऊर्फ खंडु शिवाजी सुपनेकर गेला होता असा संशय घेऊन  निलेश काशीनाथ मोटकट्टे , विक्रम शरद बंडलकर , विनोद सुरेंश मोटकट्टे , अर्जुन लक्ष्मण मोटकट्टे , राहुल बाळु मोटकट्टे , पंडीत ऊर्फ सुरज शशीकांत मंडले , वैभव दिलीप मोटकट्टे , विरोध राजेंद्र युधावले  , अभिजीत राजेंद्र मोटकट्टे या सर्वांनी सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री पावनेदहा वाजण्याच्या सुमारास  माळवाडी येथील लक्ष्मीमंदीराचे पाठीमागे विश्वास पाटील याला अडवून  जाब विचारुन शिवीगाळी करुन मारहाण करीत होते.
यावेळी वर्दिदार शुभम संजय घागरे व त्याचा भाऊ प्रविण घागरे हे दोघेजण भांडण सोडवण्यासाठी गेले असता यातील आरोपी अर्जुन मोटकट्टे याने शुभम घागरे याला देखील शिवीगाळ करुन हातातील लोखंडी पाईपने डाव्या डोळयाजवळ मारुन जखमी केले. तर प्रविण घागरे याच्या अंगावर जाऊन तेथेच खाली पडलेला सिमॅन्टचा ब्लॉक उचलुन त्याच्या डोक्यात जोरात मारुन त्यास गंभीर जखमी केले.
 
सदर गुन्हयातील जखमी साक्षीदार यांचेवर सांगली येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

  याबाबत संबधीत ९ आरोपींनी मिळून संगणमत करुन बेकायदेशिर जमाव जमवुन लाथाबुक्यानी मारहाण केली आहे म्हणून शुभम संजय घागरे वय २१ वर्षे रा. लक्ष्मीमंदीर जवळ माळवाडी यांनी दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे..


  या घटनेच्या अनुशंगाने भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला व फिर्यादी यांनी दिलेल्या जबाबावरुन निलेश काशीनाथ मोटकट्टे वय-२३ वर्षे , विक्रम शरद बंडलकर वय-२२ वर्षे , विनोद सुरेंश मोटकट्टे वय २५ वर्षे , अर्जुन लक्ष्मण मोटकट्टे वय- २३ वर्षे , राहुल बाळु मोटकट्टे वय- २२ वर्षे , पंडीत ऊर्फ सुरज शशीकांत मंडले वय-२२ वर्षे , वैभव दिलीप मोटकट्टे वय-२२ वर्षे , विरोध राजेंद्र युधावले वय-२३वर्षे , अभिजीत राजेंद्र मोटकट्टे वय २० वर्षे सर्व रा. लक्ष्मीमंदीर जवळ माळवाडी ता. पलुस जि. सांगली यांच्यावर भिलवडी पोलीस ठाण्यात भादविस कलम ३२६,३२४ ३२३ ५०४, ५०६,१४३,१४७,१४९, सह मपोका क ३७(१) (अ), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   निलेश काशीनाथ मोटकट्टे , विक्रम शरद बंडुलकर , विनोद सुरेंश मोटकट्टे , अर्जुन लक्ष्मण मोटकट्टे , राहुल बाळु मोटकट्टे , वैभव दिलीप मोटकट्टे ,विरोध राजेंद्र युधावले , अभिजीत राजेंद्र मोटकट्टे या ८ आरोपींना दि.२७ फेब्रुवारी रोजी भिलवडी पोलिसांनी अटक केली आहे.
  या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. एम.एम. घस्ते करत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Youtube Link
👇

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


Tags