BANNER

The Janshakti News

केळीच्या पानांत का जेवायचं ? काय आहेत याचे फायदे? वाचा.....


====================================
====================================



केळीच्या पानांत का जेवायचं? काय आहेत याचे फायदे ? वाचा.....

केळीच्या पानावर जेवण केल्यावर अन्नाची चव चांगली लागते. अन्नाला हलकी पानाची चव, हलकी मातीची चव असली की अन्न चविष्ट लागतं. केळीच्या पानावर जेवण करण्याचं हे सुद्धा एक कारण आहे.

आपण बाहेर जेवायला गेलो, पंगतीत जेवत असलो की प्लास्टिक, थर्माकॉल अशा प्रकारच्या प्लेट्स मध्ये आपण जेवत असतो. या प्रकारच्या डिश विषारी असतात. आपण ज्या भांड्यात खातो त्याचे कण अन्नात मिक्स होतात हे कण जर हानिकारक रसायने असतील तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्या ऐवजी केळीच्या पानांत खाल्लं की अशा प्रकारचा धोका उद्भवत नाही. कॅन्सरचा धोका टळतो.

केळीच्या पानावर अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. केळीच्या पानांत पॉलिफेनॉल असतं हे पचनासाठी चांगले असते. पोटाचे आरोग्य, पचनक्रिया सुरळीत ठेवायचं असेल तर केळीच्या पानांत जेवण करा.

केळीचे पान जिवाणू नष्ट करण्यास मदत करतात. केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. जर एखाद्या पदार्थामुळे आपल्याला आजार होणार असेल तर तशी शक्यता कमी होते.

डिस्पोजेबल प्लेट्सला नैसर्गिक पर्याय म्हणून केळीच्या पानांचा वापर करणे हा पर्यावरणपूरक पर्याय आहे. प्लास्टिक आणि फोम जमिनीच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत. केळीची पाने जर जेवणासाठी वापरली गेली तर प्लास्टिक किंवा फोम प्लेट्सची गरज कमी होते आणि प्रदूषण वाढते.

संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags