BANNER

The Janshakti News

देशासाठी मल्ल घडविणाऱ्या "क्रांती" सह.साखर कारखान्याला भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून लागेल ते सहकार्य करू... अपूर्वा मंदा


www.thejanshaktinews.in

====================================
====================================

पलूस/कुंडल : वार्ताहर                 1 फेब्रुवारी 2024

 "क्रांती" कारखान्यामार्फत देशासाठी मल्ल घडवण्याचे जे आदर्श काम सुरू आहे याला निश्चितच यश मिळेल यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहाय्यक संचालिका अपूर्वा मंदा यांनी दिले.

त्या क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावरील कुस्ती संकुलास भेटी दरम्यान बोलत होत्या. यावेळी कारखान्याने ओलॉम्पिकसाठी दत्तक घेतलेल्या मल्लांशीही त्यांनी संवाद साधला.यावेळी क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते.

मंदा म्हणाल्या, आम्ही या क्षेत्रात काम करताना खेळाला पुढे नेनेसाठी जे काही लागेल ती मदत करण्यासाठी तयार असतो फक्त तुमची साथ हवी.

हा परिसर विचार आणि कृतीने समृद्ध आहे. कुंडलला आल्यावर मला एक वेगळीच ऊर्जा जाणवली. येथील खेळाडूंच्यात विशेष प्राविण्य असल्याने त्याचा उपयोग विश्वविजयासाठी नक्की होईल यात शंका नाही. आणि यासाठीच देश क्रांती संकुलाच्या या कामासाठी नेहमी ऋणी असेल.

मल्लांना भेटी दरम्यान मंदा म्हणाल्या, आपण जे काम करतो ते मनापासून करा, आधी काय करायचंय ते ठरवा त्यादृष्टीने प्रवास करा, कष्ट करा म्हणजे यशाला गवसणी घालणे शक्य होईल. तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी क्रांती संकुल आणि केंद्रीय क्रीडा प्राधिकरण सदैव तत्पर असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी मल्लांना दिली.

यावेळी उपसरपंच अर्जुन कुंभार, सदस्य किरण लाड, प्रीतम लाड, प्रशिक्षक भोलानाथ पाल, सुनील मोहिते, मेहेबूब शेख, वैभव लाड यांचेसह क्रांती कुस्ती संकुलातील मल्ल उपस्थित होते. 



देशासाठी मल्ल घडवण्याचे आजवर कोणीही धारिष्ट दाखवले नव्हते, ते शरद लाड यांनी दाखवले याबद्दल त्यांचे केंद्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने अभिनंदन....अपूर्वा मंदा 


भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहाय्यक संचालिका अपूर्वा मंदा यांचा सत्कार करताना क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड.

हेही पहा -----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags