=====================================
=====================================
रक्ताची अशुध्दी -- घरगुती उपचार ..
आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, विटामिन्स कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्तामध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारिरीक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्स ची कमी असणे, निरूत्साह होणे, सतत चिंताग्रस्त राहणे, चिडचिड होणे, राग येणे, अशक्तपणा अशी कारणे आपण ऐकतो, कारण जिवंत राहण्यासाठी जसा श्वासोच्छवास गरजेचा आहे तेवढेच महत्वाचे शरिरातील रक्त व रक्तप्रवाह.
तर आज काही विनाखर्चाचे घरगुती उपचार सुचवत आहे जे रोजच्या आहारातील आहेत जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास भरपुर रोगांपासुन स्वताच स्वताचे रक्षण करू शकतो.
◼️ दररोज किमान ३ खजुर खाणे.
◼️महिन्यातुन दोन वेळेस दुपारी सर्व भाज्यांचे सुप घेणे.
◼️ आठवड्यातुन किमान एकवेळेस जेवणानंतर पान खावे.
◼️ दररोज किमान २० ग्रॅम बडीसौफ खाणे.
◼️ सकाळी अनोश्यापोटी एक चमचा साजुक तुप घ्यावे त्यानंतर १ तासाने कोमट पाणी घ्यावे.
◼️ टॅामेटो - गाजर - बीट इत्यादी सॅलाड दररोज दुपारी किमान एकवेळेस तरी घ्यावे.
◼️ शिर्षासन ५ मीनीट व पायांच्या टाचेवर ५ मी. उभे राहावे.
◼️ महिन्यातुन किमान एकदा १.५ लीटर कोमट पाण्यात मीठ टाकुन ते प्यावे व वमन करावे
◼️ महिन्यातुन ७ दिवस रात्रीचे जेवण बंद करावे, सलाड व पाणी चालेल.
◼️ महिन्यातुन २ वेळेस भेंडी व दोडक्याचे ज्युस करून त्यात काळी मिरी ची पावडर व काळे मीठ टाकुन ते कमीतकमी एक कपभर किंवा अर्धाग्लास तरी घ्यावे.
◼️ पहाटे लवकर उठून १० मीनिट प्राणायाम करावा.
◼️ ज्यांना वांग आहेत किंवा रक्ताचे इतर काही विकार आहेत, किंवा काही गुप्त त्रास आहेत त्यांनी बृहदहरिद्राखंड चुर्ण ३ महिने घ्यावे. ते कोठेही सहज उपलब्ध आहे. सकाळी व रात्री एक चमचा पाण्यासोबत.
◼️ स्त्रियांनी मासिक पाळीनंतर व त्याआधीच्या त्रासासाठी दररोज दुपारी जेवणानंतर अर्धाग्लास कोमट पाण्यात काळे मीठ टाकुन नियमित घ्यावे. रक्ताची शुध्दी होतेच शिवाय शरिरातील विषतत्वे हि नाहिशी होतात.
◼️ दररोज कमीत कमी २० मीनीट चालावे.
◼️ कडधान्ये, पालेभाज्या, तूप, काळे मीठ, लिंबुचा रस याचे सेवनाने रक्त शुध्द होतेच शिवाय अशक्तपणा हि जातो.
◼️ आठवड्यातुन किमान एकदा दोन्ही पाय कोमट पाण्यात बुडवुन अगदी थोडासा चुना टाकावा व २०/२५ मीनीट बसावे. रक्तातील विषाणु ओढले जातात. असे दररोज केल्यास उत्तमच.
◼️ कोणत्याही आहारामध्ये थोडीशी सुंठ वापरावी.
वरील काही मोजके उपाचार सुचवले आहेत, याव्यतिरिक्त अनेक असे घरगुती उपाय आहेत ज्याने असाध्य रोगांवर मात करण्यास आपण आपल्या शरिराला मदत करू शकतो. परंतु ते सर्व लिहिणे शक्य नाही, तेव्हा वरील पैकी कोणतेही जे सहज शक्य असतील ते उपाय करून स्वताला व परिवाराला निरोगी करूया.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆