yuva MAharashtra क्रांतीला व्हिएसआय चा तांत्रिक कार्यक्षमतेचा आणि ऊस विकास संवर्धनाचा प्रथम पुरस्कार जाहीर : शरद लाड ....यासह वैयक्तिक उक्तृष्ठ चिफ केमिस्ट चा पुरस्कार हि जाहीर.

क्रांतीला व्हिएसआय चा तांत्रिक कार्यक्षमतेचा आणि ऊस विकास संवर्धनाचा प्रथम पुरस्कार जाहीर : शरद लाड ....यासह वैयक्तिक उक्तृष्ठ चिफ केमिस्ट चा पुरस्कार हि जाहीर.




====================================
====================================

कुंडल : वार्ताहर दि. ६ जानेवारी २०२४

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचा दक्षिण विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा सर्वोकृष्ट प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासह कारखान्याला दक्षिण विभागातूनच उक्तृष्ठ ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ही प्राप्त झाला आहे तसेच वैयक्तिक पातळीवरील उक्तृष्ठ चीफ केमिस्ट म्हणून किरण पाटील यांना पूरस्कार जाहीर झाल्याचे ही त्यांनी सांगितले.

अध्यक्ष शरद लाड
शरद लाड म्हणाले, कारखान्याने कमी उत्पादन खर्चात साखर निर्मिती केली तसेच मिल मधील उसाचा तंतुमय निर्देशांक 85.80 टक्के ठेवला, रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रक्शन 96.15 राखून वाफेचा कार्यक्षम वापर केला. तसेच साखर तयार करण्यासाठी 24.98 किलो वॉट प्रतिटन विजेचा वापर केला यांमध्ये बगॅस चा वापर ही 16.12 टक्के करत यातही बचत केली आहे. गाळप क्षमतेच्या वापरात ही वाढ झाल्याने देखभाल दुरुस्ती खर्च मर्यादित राखून हा उक्तृष्ठ कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कारखान्याने व्हीएसआयच्या मार्गदर्शनानुसार हंगाम निहाय ऊस लागवड व तोडणीचे काटेकोर अंमलबजावणी करत ऊस नोंदणी, तोडणी व वाहतुकीचे मोबाईल ऍपद्वारे नियोजन केले आहे तसेच हिरवळीची खते, प्रमाणित बियाणे, कंपोष्ट खत या निविष्ठा शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या आहेत, शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दौरे आयोजित केले व त्यांना सक्षम केले, उसाला ठिबक सिंचनाचा वापर वाढवला, कारखाण्यामार्फत मोफत पाणी व माती परीक्षण करून दिले जाते, ऊस लागवड व तोडणीत यांत्रिकीकरण, पीक संरक्षणावर भर देऊन कमी उत्पादनाच्या शेतकर्यांच्यासाठी उत्पादन वाढीसाठी विशेष योजना आखल्या आणि त्या कार्यक्षमरीत्या राभवल्याने हा उक्तृष्ठ ऊस विकासाचा प्रथम पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कारखान्याचे चीफ केमिस्ट किरण पाटील यांना उक्तृष्ठ चीफ केमिस्ट पुरस्कार मिळाल्याचे ही त्यांनी सांगितले.

आजवर कारखाना क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या विचारांनी आमदार अरुणअण्णा लाड यांनी काटेकोर नियोजनाने चालवला आहे यापुढेही आम्ही सभासदांच्या विश्वासास पात्र ठरून, कारखाना यशाची शिखरे पादाक्रांत करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆