BANNER

The Janshakti News

पलूस : बोरजाईनगर येथील जि.प.प्रा. शाळेचे क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश

 
=====================================
=====================================

पलूस (ता.४) : लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूम येथे गुरुवार दि. २८ व २ ९ डिसेंबर २०२३ रोजी पलूस तालुक्यातील आमणापूर केंद्र अंतर्गत घेण्यात आलेल्या केंद्र स्तरावरील क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
  या स्पर्धेसाठी १० शाळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये बोरजाई नगर येथील जि.प.प्रा. शाळेने सांघिक व वैयक्तिक क्रिडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी बजावली.

सांघिक क्रिडा प्रकारात मुलींच्या संघाने कबड्डी व खो-खो मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर मुले व मुलींच्या दोन्ही संघानी ४×५० मी. रिले शर्यतीत देखील प्रथम क्रमांक मिळविला.


वैयक्तिक क्रिडा स्पर्धेत कु. रितिका संतोष मोटकट्टे  गोळाफेक प्रथम क्रमांक, कु. सृष्टी रमेश हाचद १०० मी धावण प्रथम क्रमांक , कु.वैष्णवी सुर्यकांत पाटील १०० मी.धावणे तृतीय क्रमांक , ५० मी धावणे कु. आरोही संतोष कदम  प्रथम क्रमांक तर कु.साईश्वरी संदिप भुईटे द्वितीय क्रमांक तर के साईश्वरी संदीप भोईटे द्वितीय कमांक, लांब उडी मध्ये  कु. तनुजा बंडू डाहाळे तृतीय क्रमांक मिळवून चमकदार कामगिरी केल्याबद्दल या खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


या खेळाडूंना आमनापूर केंद्राचे केंद्र प्रमुख संजय डोंगरे यांचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेचे मुख्याध्यापक  धोंडीराम पिसे, क्रिडा शिक्षक शंकर टकले व आनंत बांगर यांचे मार्गदर्शन लाभले. 
 या क्रिडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडू सह सहभागी सर्वच खेळाडूंचे पलूस तालुका गटशिक्षणाधिकारी  अनिस नायकवडी  व शिक्षण विस्तार अधिकारी  प्रकाश कांबळे यांनी अभिनंदन केले. 
 या स्पर्धेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सज्जन शिंदे , उपाध्यक्ष धनाजी कदम यांच्यासह सर्व सद्स्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆