====================================
====================================
मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्याठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सच्या त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते. या लेखात मूळव्याध लक्षणे, कारणे, उपचार आणि त्यावरील उपाय याविषयी महिती दिलेली आहे.
पाइल्स समस्येमध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येत असते. तसेच शौचाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होत असतात. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तसुद्धा जात असते.
मुळव्याध होण्याची कारणे...
मुळव्याध त्रास होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. प्रामुख्याने चुकीचे खानपान, बद्धकोष्ठता, सततचे बैठे काम, कुटुंबात पाईल्सची अनुवंशिकता असणे, प्रेग्नन्सी आणि लठ्ठपणा असल्यास पाईल्सची समस्या होऊ शकते.
बद्धकोष्ठतेमुळे पाईल्सची समस्या होऊ शकते...
चुकीच्या आहारामुळे पाइल्सची समस्या होऊ शकते.
मूळव्याधची लक्षणे...
मूळव्याध समस्येमध्ये गुदाच्या शिरांना सूज येते, त्याठिकाणी कोंब किंवा मोड येतात. गुदाच्या ठिकाणी भयंकर वेदना होणे, खाज येणे, जळजळ व आग होणे अशी लक्षणे असतात.
शौचाच्या वेळी त्रास अधिक वाढतो. काहीवेळा शौचातुन रक्तही जात असते. अधिक प्रमाणात रक्त जाण्यामुळे ऍनिमिया होऊ शकतो. अशी मूळव्याधची लक्षणे असतात.
मूळव्याध प्रकार (Piles Types)-
1) Internal Hemorrhoid...
अंतर्गत पाईल्स हे गुदाच्या आत होतात. शौचाच्यावेळी इंटर्नल पाईल्सचे कोंब बाहेर येतात आणि नंतर पुन्हा आत आपल्या जागेवर जातात. इंटर्नल पाईल्सचे चार ग्रेड (piles garde) मध्ये वर्गीकरण केले जाते.
पहिली ग्रेड – Piles Grade... यातून रक्त येऊ शकते मात्र यातील कोंब गुदाच्या ठिकाणी हे बाहेर येत नाहीत.
दुसरी ग्रेड – Piles Grade...
शौचाच्यावेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात आणि पुन्हा आत आपल्या जागी जातात.
तिसरी ग्रेड – Piles Grade...
शौचाच्यावेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात मात्र ते आपोआप पुन्हा आत जात नाही. ते आत जाण्यासाठी हाताने ढकलावे लागतात.
चौथी ग्रेड – Piles ग्रेड... या प्रकारचे कोंब हे सतत बाहेर आलेले असतात. ते ढकलूनही आत जात नाहीत. त्या कोंब जास्त सुजलेले आणि वेदनादायक असतात.
मुळव्याध आणि उपचार...
मूळव्याधचा प्रकार, स्थिती यावर उपचार अवलंबून असते. सुरवातीच्या त्रासात जीवनशैलीतील बदल, योग्य आहार आणि औषध उपचार याद्वारे मूळव्याधपासून सहज सुटका करता येते. मात्र मूळव्याधकडे दुर्लक्ष केल्यास त्रास अधिक वाढतो आणि अशावेळी मात्र औषधोपचार बरोबरच काहीवेळा शस्त्रक्रियेचा (piles surgery) अवलंब करावा लागतो.
तसेच मूळव्याधवर अनेक आयुर्वेदिक औषधे गोळ्या, काढा आणि क्रीम स्वरूपात उपलब्ध आहेत. यांमुळे मूळव्याध त्रासातील सूज, वेदना, खाज येणे, रक्त पडणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
डॉ. सतीश उपळकर,
सुनील इनामदार.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆