BANNER

The Janshakti News

खाजगी मराठी प्राथमिक शाळेत क्रीडा महोत्सव                                        व्हिडीओ
                                            👇
======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर 

 भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मध्ये शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. भिलवडी येथील तलाठी सोमेश्वर जायबाये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाचे पूजन करण्यात आले.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.


मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रास्ताविक व स्वागत क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील यांनी केले.खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतो.विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभाग घ्यावा असे सांगून सर्व विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.शरद जाधव यांनी आभार मानले.विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफनी क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्टपणे संयोजन केले.विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये विद्यार्थी सहभागी झाले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆