BANNER

The Janshakti News

महामानावांच्या आणि इतर अनेक वीरांच्या त्यागामुळेच आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत ...आमदार अरुण लाड



=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर

आमदार अरुणअण्णा लाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आणि क्रांतिसिह नाना पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिसिंहांच्या स्मारकामध्ये त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांनीही अभिवादन केले.

यावेळी आमदार लाड म्हणाले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक निष्णात अर्थतज्ज्ञ होते. याबरोबरच जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद याविरुद्ध लढा देणारे समाजक्रांतिकरक आणि वंचितांच्या कल्याणाचा वसा घेतलेले कुशल राष्ट्रभक्त म्हणून जगभर परिचित आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारावून त्यांनी तयार केलेल्या संविधानाचा केवळ देशभरच नव्हे तर जगभर आदर केला जातो.

त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी असलेले क्रांतिसिह नाना पाटील हे ही एक अग्नीपुंज आहेत. क्रांतिसिंहांनी राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन त्यांचे पूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केले होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार स्थापून अनेक तरुण स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले. क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड, नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या सारखे हजारो तरुण प्रेरित होऊन या संग्रामात उड्या घेतल्या.त्यांच्या त्यागाला, बलिदानाला आजही तोड नाही.

या दोन महामानावांच्या आणि इतर अनेक वीरांच्या त्यागामुळेच आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी क्रांती कारखान्याचे सर्व कर्मचारी, क्रांती इंटरनॅशनल स्कुलच्या शिक्षिका अभिवादानासाठी उपस्थित होत्या.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिह नाना पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार अरुणअण्णा लाड, शरद लाड आदी.

हे पण पहा ------





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆