५१५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान
=====================================
=====================================
मंगळवेढा | प्रतिनिधी - भैय्या खिलारे
मंगळवेढा पोलीस ठाणे येथे दि.२६/११ रोजी झालेल्या हल्ल्यात शहिद जवानांना अभिवादन करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने काल गुरुवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. दरम्यान ५१५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
दि.२६/११/२००८ रोजी मुंबई येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्यामध्ये अनेक जवान शहिद झाले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवेढा विभागाचे डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक डमाळे, अंकुश वाघमोडे, पत्रकार दिगंबर भगरे, मल्लिकार्जुन देशमुखे, दादा लवटे, युवराज घुले, अँड. रमेश जोशी, बठाणचे माजी सरपंच बिभीषण बेदरे, संजय बळवंतराव, उपसरपंच राजू बेदरे,
सोड्डीचे संतोष सोमुत्ते, गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील ५१५ इच्छुक रक्तदात्यांनी पुढे येवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. पंढरपूर ब्लड सेंटरचे संतोष उपाधे, दशरथ फरकंडे, योगेश कवेकर, अजय जाधव आदींनी यासाठी परिश्रम घेतले.
हे पण पहा -----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆