BANNER

The Janshakti News

शरदपर्व क्रांतिविचार मंच अंतर्गत आयोजित , छत्रपती किल्ले बनवा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

======================================
======================================

पलूस / कुंडल : वार्ताहर दि. २७ नोव्हेंबर २०२३

किल्ले घडवले तसे राज्य घडवा, भविष्यातील महाराष्ट्र तुमच्याच हातात आहे अशी प्रेरणा शिवप्रेमी बालचमुंना क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिले.

ते शरदपर्व क्रांतिविचार मंच अंतर्गत पलूस तालुक्यात छत्रपती किल्ले बनवा स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना बोलत होते. पलूस तालुक्यातून या स्पर्धेत 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

शरद लाड म्हणाले, तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात, तुमच्याच शिरावर महाराष्ट्राची धुरा आहे. छत्रपतींनी किल्ले नागरिकांच्या संरक्षणासाठी बनवले होते यातून त्यांची भूमिका लक्षात घेऊन, छत्रपतींची स्फूर्ती आत्ताच्या पिढीला मिळावी यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते.भविष्यात या स्पर्धा राज्यपातळीपर्यंत न्हेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक सावंतपूर वसाहत येथील जय भवानी ग्रुपने पटकावला, द्वितीय आमनापूर येथील जगदंब ग्रुपने पटकावला, तृतीय क्रमांक विभागून बांबवडे येथील शिवरत्न ग्रुप आणि आमनापूर येथील मध्यवर्ती ग्रुपने पटकावला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रमानपत्र, पदक आणि शिवमूर्ती असे होते. तर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन प्रोत्साहन देणेत आले.

यावेळी मोहन एडके, प्रीतम लाड, किरण गावडे, ग्रामपंचायत सदस्य किरण लाड, अभिजित तोडकर, पवन चव्हाण यांचेसह स्पर्धक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शरदपर्व आयोजित छत्रपती किल्ले बनवा स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांसह क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड.
हे पण पहा -----

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆