BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जयंती निमित्त त्यांच्या नावाने दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा " क्रांतिअग्रणी पुरस्कार " डॉ अभिनेता सयाजी शिंदे यांना जाहीर=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर                      दि. 26 नोव्हेंबर 2023

क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या जयंती निमित्त त्यांच्या नावाने दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा " क्रांतिअग्रणी पुरस्कार" डॉ  अभिनेता सयाजी शिंदे यांना जाहीर झाला आहे.


"क्रांतिअग्रणी पुरस्कार " डॉ  अभिनेता सयाजी शिंदे यांना जाहीर


 हा पुरस्कार वितरण सोहळा दि 4 डिसेंबर रोजी कुंडल (ता पलूस) येथे सुप्रसिद्ध विचारवंत व ख्यातनाम लेखक प्रा.डॉ.राजन गवस यांच्या हस्ते पार पडणार आहे.

 या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे असेल अशी माहिती आमदार अरुणअण्णा लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार लाड म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठित असा " क्रांतिअग्रणी पुरस्कार" सातारा जिल्ह्यातील साखरवाडी गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून, छोटा-मोठा कोणीही असला तरीही अन्न आणि ऑक्सिजन सर्वानाच लागतो. आईच्या उदरातून बाहेर आल्यापासून ऑक्सिजनच जगवतो मग असा जीवनावश्यक ऑक्सिजन देणारे वृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून त्यांनी "सह्याद्री देवराई" ही संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून 10 लाखांवर वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन ही करत आहेत. सुरुवातीपासूनच थिएटर आणि चित्रपटांबाबतच्या रुचीने एक उक्तृष्ठ अभिनय करत फिल्मफेअर सर्वोकृष्ट खलनायक, सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता अशा पुरस्कारांनी सन्मानित केलेले आणि चित्रपटांमध्ये जरी सर्वोकृष्ट खलनायक पुरस्कारणे सन्मानित केले असले तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र खरे नायक ठरलेले सयाजी शिंदे यांना देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आहे.

ते म्हणाले, यापूर्वी या पुरस्‍काराने कवीवर्य नारायण सुर्वे,समाजसेविका मेघा पाटकर, शबाना आझमी, डॉ.श्रीराम लागू,जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंह राणा,डॉ.वसंतराव गोवारीकर, समाजसेविका डॉ.राणी बंग, जेष्‍ठ पत्रकार उत्‍तम कांबळे, पत्रकार पी.साईनाथ, डॉ.शिवानंद सोरटूर, डॉ.प्रकाश आमटे, डॉ.बाबा आढाव, जेष्‍ठ कम्युनिष्‍ठ नेते ए.बी.बर्धन, डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ.एन.डी.पाटील, पद्मश्री डॉ.तात्‍याराव लहाने, प्रा.पुष्‍पा भावे, डॉ.रवींद्र कोल्हे यांना गौरविण्‍यात आले आहे.

हे पण पहा -----◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆