======================================
कुंडल : वार्ताहर Date - 16 Nov 2023
प्रतिसरकारच्या चळवळीचे फिल्डमार्शल, क्रांतिअग्रणी डाॕ.जी.डी. बापू लाड यांच्या पुण्यतिथी निमित्त कुंडल (ता पलूस) येथे विविध ठीकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
क्रांतिअग्रणी डाॕ. जी. डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायत कुंडल, क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड महाविद्यालय, प्रतिनिधी हायस्कूल, क्रांती इंटरनॕशनल पब्लिक स्कूल, क्रांती दुध संघ, क्रांती गारमेंट, गणेशवाडी, सत्येश्वर, बसवेश्वर पाणीपुरवठा संस्था,कुंडल विकास सोसायटी, व अन्य सर्व संस्थामध्ये स्वर्गिय क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंना आदरांजली वाहनेत आली.
यावेळी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले की, स्वर्गिय बापूसाहेबांनी नेहमी कष्टकरी, शेतकरी, कामगारवर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम केले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेच परंतू स्वातंत्र्यानंतर ही सतत कष्टकरी,शेतकरी व कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी झटत राहीले.
सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये सुखासमाधानाने रहाता यावे याचाच विचार त्यांनी नेहमी केला.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, कष्टकरी वर्गाला त्याच्या कामाचे योग्य दाम मिळाले पाहिजे व बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले पाहीजे , कोणीही लाचार राहु नये या हेतूनेच
क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी.बापू लाड यांनी क्रांती सह. साखर कारखान्याची उभारणी केली : आमदार अरुणअण्णा लाड
आज त्यांच्याच आदर्शावर वाटचाल करत असतान शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देऊन त्यांच्या अपेक्षाची पुर्तता आम्ही करत आहोत. कारखान्याबरोबरच इतर अनेक उद्योगांची उभारणीही होत आहे , त्यामुळे बेरोजगार युवकांच्या हाताला काम मोठ्या प्रमाणात उपलब्द्ध होत असल्याने परीसरातील युवकांच्या रोजगाराचा ही प्रश्न सुटला असल्याने स्वर्गिय बापूसाहेबांची इच्छापूर्तीच त्यांना आदरांजली ठरेल.
यावेळी आमदार मोहनशेठ (दादा) कदम, माजी आमदार सदाभाऊ पाटील, विशाल पाटील, बाळासाहेब पाटील, ऍड.प्रकाश लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जि. प. सदस्य शरद लाड, नितीन नवले, प्रदीप लाड, अर्जुन कुंभार, अशोक भिसे, नवनिर्वाचित सरपंच जयराज होवाळ, सुरेश शिंदे(सांडगेवाडी), पोपट संकपाळ, श्रीकांत लाड, प्रमोद मिठारी, माजी उपसभापती अरुण पवार, अनिल लाड, जे.पी. लाड, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, राजाराम पवार,सुनील पवार, आप्पासाहेब जाधव, मारुती जाधव(आसद), किशोर माळी, पोपट फडतरे, विनोद पाणबुडे, चंद्रकांत चव्हाण(तांदळगाव), दादा पाटील, गोरख सूर्यवंशी, बाबा शिंदे, विश्वनाथ मिरजकर, धैर्यशील महिंद, मानसिंग पाटील(पलूस, सुरेश शिंगटे, क्रांती कारखाण्याचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद , कार्यकर्ते यांनी आदरांजली वाहिली.
क्रांतिअग्रणी स्व. डाॕ. जी.डी. बापू लाड यांना क्रांती कारखाना कार्यस्थळावरील समाधीस्थळी अभिवादन करताना आमदार अरुणअण्णा लाड, माजी आमदार सदाभाऊ पाटील, विशाल पाटील, बाळासाहेब पाटील, ऍड.प्रकाश लाड, उदय लाड, किरण लाड, दिलीप लाड, शरद लाड व मान्यवर .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆