======================================
सांगली दि.०२ : रेडक्रॉस आंतरराष्ट्रीय समिती आणि इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ यांनी संयुक्तपणे ‘हेनरी डुनंट मेमोरियल मुट कोर्ट’ २२ वी स्पर्धा नवी दिल्ली येथे २२ ते २४ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेचे मुख्य उद्दीष्ट प्रामुख्याने भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा बाबत वाढती जागरूकता आणि रस विकसित करणे. याव्यतिरिक्त, विद्यार्थी समुदायात पुढील शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा वापरणे आणि मैत्रीपूर्ण स्पर्धेच्या वातावरणात त्यांचे समर्थन, कौशल्य विकसित करणे हे आहे. या स्पर्धेत देशातून एकूण ४८ हून अधिक विधी महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. तर राज्यातून पाच विधी महाविद्यालय यांनी सहभाग नोंदविला.
यास्पर्धेत शिवाजी विद्यापीठ मार्फत केवळ एन.एस.सोटी विधी महाविद्यालय अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये रिसर्चर म्हणून अमोल वेटम, तर मुटर म्हणून रोहन पाटील, आकाश सावंत या विद्यार्थ्यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अमित सवदी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित व मार्गदर्शन केले. यासोबत सहा.प्रा.प्रविणा शहा यांनी मार्गदर्शन केले. तर ग्रंथपाल प्रा. अविनाश साळुंखे यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याबाबत पुस्तके, साहित्य उपलब्ध करून देण्यास मदत केली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆