BANNER

The Janshakti News

पणजीहून हैदराबादला निघालेल्या खाजगी बसचा भीषण अपघात ; ड्रायव्हरचा जागीच मृत्यू , तर 26 जण जखमी======================================
======================================

फोंडा : पणजीहून हैदराबादला  निघालेल्या खाजगी बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या अपघातात टीएस 12 युडी 9707 या प्रवासी बसला दुर्गिणी-धारबांदोडा येथील आमिगोस हॉटेलजवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झाला आहे. या अपघातात  इतर 26 जण जखमी झाले आहेत.
सदर अपघाताची घटना सोमवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वा. सुमारास घडली.
जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे घटनास्थळावर उपस्थितीत नागरीकांच्या कडून  सांगण्यात येत आहे.  रस्त्याच्या एका वळणावर बस आली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडली आणि अपघात झाला. यावेळेला या बसमध्ये 45 प्रवासी आणि तीन चालक प्रवास करत होते.

      गौतमी ट्रान्सपोर्टची टीएस 12 युडी 9707

दुर्गिणी-धारबांदोडा येथील वळणावर भरधाव बसचा अचानक अपघात होऊन एका बाजुला बस कलंडल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढले. बसचा चालक गाडीखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन चालक आणि 24 प्रवासी असे 26 जण जखमी झाले आहेत.

बस कलंडल्यामुळे झालेल्या अपघातात नऊ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांची मदत केली. स्थानिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆