BANNER

The Janshakti News

पलुस तालुका धनगर आरक्षण समितीच्या वतीने मंगळवार दि.३ ऑक्टोबर ला विजापूर गुहागर रास्ता रोको आंदोलन                               बाईट
                                  👇


======================================
======================================

पलूस : वार्ताहर           दि.१ ऑक्टोबर २०२४

पलुस तालुका धनगर आरक्षण समितीच्या वतीने  मंगळवार दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विजापूर गुहागर महामार्ग रस्ता आंदोलन करणार आहे.धनगर समाज एस.टी.मधील आरक्षणाबाबत कार्यवाहीसाठी हे आंदोलन असणार आहे.या आंदोलनात धनगरी ढोल वाजवीत मेंढपाळ बांधव मेंढ्या घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
पलूस पोलीस ठाणे , श्रीदेवी हॉटेलजवळ महामार्गांवर रास्ता रोको करित ठिय्या आंदोलन होणार आहे. तेथून तहसील कार्यालयापर्यंत ढोल ताशाच्या निनादात घोषणा देत आरक्षणा संदर्भात शासनाकडे मागणी करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देणार आहे.
पलूस तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धनगर आरक्षण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी डॉ.दिलीप मगदूम ,तुकाराम धायगुडे, संदीप सिसाळ ,कुंडलिक येडके ,हिम्मत सिसाळ ,अंकुश पाटील, प्रशांत लेंगरे ,प्रशांत गावडे ,सुशांत येडके ,ऋषी टकले ,कुमार डाळे, मदन डाळे ,उमेश पाटील उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆