BANNER

The Janshakti News

पर्यावरणप्रेमी सचिन निकम व डॉ.उमेशकुमार पाटील यांचा गौरव..




=====================================
=====================================

पलूस : वार्ताहर                          दि. 21 सप्टेंबर 2023

सांगली जिल्ह्यातील पलूस म्हणजे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असलेले शहर म्हणून ओळखले जाते. याच पलूस शहराला संतांचा,क्रांतिकारकांचा संगीतकारांचा, वारसा लाभलेला आहे. अशा या शहरात
गेल्या काही दिवसापूर्वी पलूस शहरातील पर्यावरणप्रेमी सचिन निकम व डॉ.उमेशकुमार पाटील यांनी " सायकल चालवा पर्यावरण वाचवा , पृथ्वी वाचवा " हा संदेश घेऊन कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा सुमारे 4000 किलोमीटर प्रवास सायकलवरून पूर्ण केला. त्यांनी यशस्वी केलेला हा उपक्रम पलूसच्या प्रत्येक नागरीकांना अभिमानास्पद आहे.त्यांनी पूर्ण केलेल्या या यशस्वी प्रवासाबद्दल माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा.संग्रामभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय पलूस यांच्या वतीने सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रविराज (दादा) देशमुख यांचे हस्ते मानाचा फेटा, शाल, श्रीफळ व बुके देऊन सचिन निकम व डॉ.उमेशकुमार पाटील यांना गौरविण्यात आले.


यावेळी शंकर पवार , युवा मोर्चा पलूस शहर अध्यक्ष रोहित दादा पाटील,महेश भाऊ सुतार,प्रदीप दादा पाटील,जनसंपर्क अधिकारी तानाजी जाधव साहेब व जनसंपर्क विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

हे पण पहा....






बुधवार दि. 20 सप्टेंबर रोजी
पलूस कडेगाव राजाची आरती माजी आमदार मा. राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
या वेळी त्यांनी टेंभू योजनेचे शिल्पकार स्व. आमदार संपतरावजी देशमुख आण्णा यांच्या आठवणींना उजाळा दिला..



पलूस येथील VC टायगर ग्रुपच्या गणेश मंडळाची आरती सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.रविराज दादा देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आली...



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆