BANNER

The Janshakti News

गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रु तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा...संदिप राजोबा






======================================
======================================
 
    भिलवडी : वार्ताहर            दि. 21 सप्टेंबर 2023

 13 सप्टेंबर 2023 रोजी च्या मोर्चमध्ये माजी खासदार राजू शेट्टी संस्थापक स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कोल्हापूर येथे धडक मोर्चा  काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये साखर सहसंचालकांच्याकडे हजारो शेतकऱ्यांच्या वतीने                                                                                गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४००
रूपये देण्याची मागणी करण्यात आली होती. 
गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना यामधून चांगल्या पध्दतीने नफा मिळालेला आहे. वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बि बियाणे, किटकनाशके यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. वाढलेल्या या महागाईमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. तोंडावर दसरा आणि दिवाळी आल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे सणासुदीला पैसे नाहीत. यामुळे  कारखान्याकडून तातडीने दुसरा हप्ता ४०० रूपये खात्यावर जमा करण्यात यावा. सदरचा दुसरा हप्ता २ ऑक्टोंबर पर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न केल्यास २ ऑक्टोबरनंतर कारखान्याची साखर अडवून ढोल ताशा आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी पहिल्या टप्प्यामध्ये  रॅलीने  पहिल्यांदा क्रांती सह.साखर कारखाना कुंडल  येथे साडेआकरा वाजता , बारा वाजता सोनहिरा सह. साखर कारखाना , एक वाजता राजारामबापू सहकारी साखर कारखाना साखराळे दोन वाजता हुतात्मा सहकारी साखर कारखाना वाळवा चार वाजता विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना चिखली 32 शिराळा व पाच वाजता दालमिया शुगर  लिमिटेड निनाई नगर करुगली या सर्व साखर कारखान्यांना  निवेदन देण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे . 


हे निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी
सूर्यकांतमोरे(अण्णा) संघटनेचे जिल्हाध्यक्ष,महेश खराडे पक्षाचे अध्यक्ष,संजय बेले युवा आघाडीचे अध्यक्ष,  यु ये सनदे सो राज्य प्रवक्ते, संजय खोलकुंबे उपाध्यक्ष बाबासो सांद्रे, वाळवा तालुका अध्यक्ष जगन्नाथ भोसले  युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष धन्यकुमार पाटील बाळासो जाधव राजेंद्र माने सम्मेद पाटील राजू पाटील नंदकुमार माने सुधीर जाधव श्रीकृष्ण पाटील बाबुराव शिंदे रामदास महिंद भीमराव होनमाने व पदाधिकारी व शेतकरी उपस्थित राहणार आहेत निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆