======================================
कडेगाव : वार्ताहर दि. 19 सप्टेंबर 2023
कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख (वय 45) यांचे आज मंगळवारी निधन झाले.महसूल प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ.देशमुख यांच्या निधनाचे वृत्त कळताच महसूल विभागात शोककळा पसरली आहे.
डॉ.देशमुख यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.
कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या पंधरा दिवसापासून उपचार सुरु होते.पण,आज सायंकाळी उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.डॉ.देशमुख यांचा महसूल प्रशासनात कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून दबदबा होता.महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच ते सामान्य जनतेशीही आपुलकीने बोलत असत.
डॉ.देशमुख हे 2009 बॅचचे उपजिल्हाधिकारी होते.त्यांनी यापूर्वी पंढरपूर,माळशिरस,इस्लामपूर येथे प्रांताधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले होते.तर डॉ. देशमुख यांनी यापूर्वी कडेगाव प्रांताधिकारी म्हणून काम केले होते.गेल्या तीन महिन्यापूर्वी पुन्हा याच ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली होती.निवासी उपजिल्हाधिकारी सांगली येथेही काम केले होते.डॉ.देशमुख मुळ गाव अंबक (ता.कडेगाव) तर सध्या ते कराड येथे वास्तव्यास होते.
त्यांच्यावर कराड येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच जिल्हा अधिकारी राजा दयानिधी , उपजिल्हाधिकारी विकास खरात , रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महिंद्र आप्पा लाड , तलाठी महासंघाचे कार्याध्यक्ष गौसमोहम्मद लांडगे यांच्या सह सांगली जिल्ह्यातील शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी तसेच पलूस कडेगाव तालुक्यातील राजकीय , सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कराड येथे अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆