======================================
======================================
वाळवा : वार्ताहर दि. 19 सप्टेंबर 2023
नवेखेड ता.वाळवा येथील वारकरी संप्रदायाचे जेष्ठ किर्तनकार ह.भ.प.शंकर दादू जाधव (महाराज) यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले, ज्ञानेश्वरी,तुकारामगाथा, या ग्रंथाचे गाडे अभ्यासक होते. हे दोन्ही ग्रंथ त्यांच्या तोंडपाठ असलेले एकमेव किर्तनकार म्हणून त्यांची पंचक्रोशीत ख्याती होती, तीर्थक्षेत्र पंढरपूरचे महिन्याचे वारकरी धारकरी होते, महाराष्ट्रात विना मोबदला किर्तन व प्रवचने करत असत,अखिल भारतीय वारकरी वांड़मय साहित्य मंडळाच्या परिषद वतीने महाराष्ट्रातुन उत्तरप्रदेश राज्यातीलमध्ये तीर्थक्षेत्र कुरूक्षेत्र वर त्यांचे भगवतगिता या विषयावर त्यांचे प्रवचन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,एक मुलगी,पुतणे सुना नातवंडे असा परिवार आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांचे ते चुलते होत.
रक्षाविसर्जन -------
बुधवार दि. 20/09/2023 रोजी सकाळी 9:00 वाजत नवेखेड कृष्णाकाठ तिरी होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆