BANNER

The Janshakti News

शरद जाधव यांना सांगली रोटरी क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड

======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                          दि. २४ सप्टेंबर २०२३

अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी ता.पलूस येथील सहाय्यक शिक्षक,प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार, धनगांव गावचे सुपुत्र शरद जाधव यांना रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
रोटरी हॉल गणेशनगर सांगली येथे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शितल शहा यांचे अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
शिक्षण क्षेत्रात राबविलेले विविध उपक्रम,शालेय कामकाजासोबत राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने केलेल्या  सामाजिक कार्याची दखल घेत सांगली  जिल्ह्यातून निवडलेल्या सात शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.यावेळी बोलताना शितल शहा म्हणाले की,शाळेत शिकणारे विद्यार्थी भावी राष्ट्राचे आधारस्तंभ असतात.त्यांना घडविणारे शिक्षक हे राष्ट्र उभारणी करण्याचे महान कार्य करीत आहेत.त्यांच्या मधील गुणवत्ता शोधून त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ध्येयवेड्या शिक्षकांना नेशान बिल्डर अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव करते.


यावेळी बोलताना शरद जाधव म्हणाले की,रोटरी क्लब ने विश्वभर दातृत्वाची मोठी परंपरा निर्माण केली आहे.त्यांनी पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप आम्हा धापडणाऱ्या शिक्षकांसाठी प्रेरणादायी अशी आहे.
रोटरी क्लब ऑफ सांगलीचे चेअरमन सलील  लिमये यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.चिदंबरम मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.अजय शहा यांनी आभार मानले.


यावेळी रोटरीचे सेक्रेटरी महेश झंवर,रागिणी शहा,रामकृष्ण चितळे,अरुण दांडेकर,उद्योजक गिरीश चितळे, डॉ.सुहास जोशी, किशोर लुल्ला,सुधा कुलकर्णी, डॉ.चंद्रशेखर पुरंदरे,अमित चोरडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆