BANNER

The Janshakti News

अनिल जाधव यांची भिलवडी शिक्षण संस्थेस तीन लाख एकावन्न हजाराची देणगी
=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर                       दि. 2 सप्टेंबर 2023

भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवनिमित्त मे.अनिल जाधव  कन्स्ट्रक्शन  सांगलीचे कॉन्ट्रॅक्टर  अनिल जाधव यांनी भिलवडी शिक्षण संस्थेला तीन लाख एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली.जाधव यांनी रकमेचा धनादेश  भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे व उपाध्यक्ष  डॉ. बाळासाहेब चोपडे यांचेकडे सुपूर्द केला.जाधव परिसरातील गेल्या तीन पिढ्या बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत.
विश्वास चितळे यांचे हस्ते बुके देऊन जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
सुप्रसिद्ध आर्किटेक्चर गाडगीळ यांनी देखील भिलवडी शिक्षण संस्थेच्या विविध वास्तू उभारणीत मोठे योगदान दिले असल्याबद्दल त्यांचे ही ऋण व्यक्त केले.
यावेळी अनिल जाधव,इंजि. राकेश जाधव, भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे,जयंत केळकर, आदी उपस्थित होते.


अनिल जाधव यांनी देणगीचा धनादेश विश्वास चितळे यांच्या कडे सुफूर्द केला.यावेळी गिरीश चितळे, डॉ.बाळासाहेब चोपडे आदी.

आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
                           👇


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆