BANNER

The Janshakti News

स्वरसंध्या संगीतसभेत रसिक मंञमुग्ध ; पलूसकर शिक्षण संस्थेत सुरेल मैफील संपन्न....


 
======================================
======================================      
पलूस : प्रतिनिधी                    दि. 16 सप्टेंबर 2023      
   
  पलूस : गानसम्राट संगीतभगीरथी पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्या पुण्यतिथी आणि पं. विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्था स्थापना दिनानिमित्त  आयोजित स्वरसंध्या  या शास्त्रीय गायन,भक्तीगीत,सुगम गायनाची बहारदार संगीत मैफिलीस रसिक प्रैक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.या संगीत सोहळ्यानिमित्त ऋषिकेश बडवे पुणे  यांनी विविध गीते सादर केली.


 हार्मोनिअम साथ सारंग साभारे यांनी तबला साथ रुद्राक्ष वझे यांनी दिली.पलूस येथील कै.प्रभाकर माधवराव परांजपे  सभागृहात ही भव्य संगीत  मैफिल रंगली.कार्यक्रमाची सुरूवात पंडित विष्णू दिगंबर पलूसकर, माधवराव परांजपे, सरस्वती प्रतिमेच्या  पूजनाने झाली. यावेळी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे साहेब, उपाध्यक्ष विश्वास रावळ, सचिव जयंतीलाल शहा, संचालक शंतनु परांजपे, सौ. प्राजक्ता परांजपे, मुख्याध्यापक तानाजी करांडे,सर्व संगीत प्रेमी उपस्थित होते.


     सर्व रसिक श्रोत्यांनी  सुश्राव्य गायन व हार्मोनिअम व तबलावादनाचा लाभ घेतला . सोलोवादन राग पुरीया व कल्याण सादर केला शास्त्रीय   संगीत राग केदार, त्रिताल ,बंदीश सादर केली भक्तीगीत नाट्यगीत, अभंग,.दर्जेदार गीते  सादर करून मंत्रमुग्ध केले.. मर्मबंधातील ठेवही रवी मी, वृंदावनू वेणू  कवणाचा माय वाजे, सुरांनो चंद्र व्हा, कानडा राजा पंढरीचा, काय या संतांचे मानू उपकार.विविध रचनांनी रसिकांची मने जिंकली.या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक एस.बी.टोणपे,केंद्रप्रमुख राम चव्हाण ,जयवंत मोहिते, माजी नगरसेवक दिलीप जाधव, मानसिंग इनामदार, मोहन सुतार ,संजय गोंदिल ,चंद्रकांत मोरे ,विजय कांबळे,पलूस परिसरातील अनेक संगीत प्रेमी उपस्थित होते.     सर्वांचे स्वागत बळीराम पोतदार यांनी केले .संयोजन अनिल बामणे,विकास गुरव ,शंकर गस्ते,जगन्नाथ सुवासे , सौ. प्रीती नरुले सौं.अलका बागल,सौ.प्रज्ञा बिराज, अविनाश चव्हाण यांच्यासह प्राथमिक माध्यमिक व जुनिअर विभागाच्या  सर्व शिक्षक, शिक्षिका,  शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆