BANNER

The Janshakti News

जो पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळेत नाही तो पर्यंत सर्वपक्षीय नेतेमंडळींना धनगावांत प्रवेश नाही ; गावकऱ्यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय


======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                 दि. 6 सप्टेंबर 2023

जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय नेते मंडळींना पलूस  तालुक्यातील धनगांव गावात प्रवेश करून दिला जाणार नसल्याचा,तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा  निर्णय संपूर्ण गावकऱ्यानी घेतला आहे.

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ धनगाव मधील सकल मराठा बांधवांनी गावातून निषेध फेरी काढली. शिवतीर्थावर सर्वांनी एकत्रित आलेल्या फेरीचे सभेत रूपांतर झाले.सरपंच सतपाल साळुंखे,सोसायटीचे चेअरमन दिपक भोसले,दत्ता उतळे,रविंद्र साळुंखे,आनंदराव उतळे,अरविंद साळुंखे,कुमार सव्वाशे,राज साळुंखे,राज साळुंखे,जयदीप यादव,
दत्ता उतळे,रविंद्र साळुंखे आदींनी आपल्या मनोगतातून मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नागरिक आपल्या मुद्द्यांवर ठाम असल्याचा निर्धार व्यक्त केला.आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणत्याच पक्ष्यांच्या नेत्यांना प्रवेश करून द्यायचा नाही,येथून पुढे येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर नागरिक बहिष्कार घालणार असल्याचा ठराव सर्वानुमते हात उंचावून मंजूर करण्यात आला.सकल मराठा समाजाच्या वतीने
  

 
सरपंच सतपाल साळुंखे यांना निवेदन दिले.ग्रामपंचायत व सकल मराठा समाज राज्याचे मुख्यमंत्री,सर्व मंत्री,खासदार,आमदार,प्रशासकीय अधिकारी,निवडणूक आयोग,पोलीस प्रशासनास निवेदन देणार आहे.
यावेळी पोलीस पाटील सौ.मनिषा मोहिते, सुरेश साळुंखे,अनिल साळुंखे,रमेश पाटील,शरद साळुंखे,सुनिल भोसले,सुनिल मोहिते,माणिक तावदर,शैलेश साळुंखे,सौरभ पाटील,प्रशांत साळुंखे,शैलेश साळुंखे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - सकल मराठा समाजाच्या वतीने धनगांव चे सरपंच सतपाल साळुंखे यांना निवेदन देण्यात आले.

-------------------------------------------------------------------
आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
                                     👇


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆