BANNER

The Janshakti News

क्रांति सह. साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला देशातील सर्वोक्तृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर==============================
==============================

कुंडल : वार्ताहर                                   दि.६ सप्टेंबर २०२३

क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला देशातील सर्वोक्तृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

             शरद लाड, अध्यक्ष क्रांती सह.साखर कारखाना

शरद लाड म्हणाले, को-जनरेशन असोसीयेषण ऑफ इंडिया कडून देश पातळीवर सहवीज निर्मिती करणाऱ्या संस्थांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम केले जाते. या संस्थेकडून ज्या संस्थांकडून सहवीज निर्मिती केली जाते त्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा पुरस्काराचे वितरण केले जाते.

यासाठी कारखान्याने मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात किती वीज निर्मिती केली, वाफेचा कार्यक्षम वापर, किती कार्यक्षमतेने प्रकल्प चालवला व किती वीज निर्यात केली, कारखान्याला कमीत कमी वीज वापर कसा केला,वीज निर्मिती करण्यासाठी पाण्याची बचत किती केली, वीज निर्मिती करून निघणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा केला जातो, सहवीज निर्मिती प्रकल्पाकडील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे का, बॉयलर मधून निघणाऱ्या कार्बनने पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी काय केले आहे, सहवीज निर्मिती प्रकल्पात सुरक्षितता काय सांभाळली जाते, वीज निर्मितीसाठी किती खर्च येतो या सर्व निकषांचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्काराचे वितरण 16 सप्टेंबर रोजी पुण्यात खासदार शरद पवार यांच्या हस्ते वितरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

--------------------------------------------------------------------
आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
                                         👇


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆