BANNER

The Janshakti News

खासदार संजयकाका पाटील व आमदार विश्वजीत कदम यांच्या मध्यस्थीने वसगडे येथील शेतकरी व रेल्वे प्रशासन यांच्यातील वाद मिटला
भिलवडी प्रतिनिधी दि.16 सप्टेंबर 2024

वसगडे ( ता.पलूस ) येथील रेल्वे प्रशासनाकडून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलने करुनही दाद न देणाऱ्या रेल्वे अधिकार्यांची  खासदार संजयकाका पाटील व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत चांगलीच कान उघडणी केली. त्यानंतर रेल्वे प्रशासन रुळावर आले आणि वसगडे येथील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न व मागण्या १५ नोव्हेंबर पर्यंत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले
    दि. १३/९/२३रोजी वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी कोल्हापूर गोंदिया (महाराष्ट्र एक्सप्रेस) सुमारे चार तास थांबवल्यानंतर मा.आ.डॉ. विश्वजीत कदम यांनी  शेतकऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला व  दि. 15/9/ 2023 रोजी पुणे येथे बैठकीचे नियोजन केले . त्यानंतर सदर रेल्वे गाडी शेतकऱ्यांच्याकडून सोडण्यात आली. 
 त्यानुसार शुक्रवारी सदर बैठक पार पडली . या बैठकीस विभागीय आयुक्त मा. सौरभ रावसाहेब,  डी.आर.एम.श्रीमती इंदू दुबे,.आ.डॉ. विश्वजीत कदम मा.खा.संजय (काका) पाटील, मा.जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीसाहेब, उपजिल्हाधिकारी विकास खरात, श्री सुरेश पाखरे (मुख्य अभियंता निर्माण रेल्वे ) अजय शिंदे प्रांताधिकारी कडेगाव, निवास ढाने तहसीलदार पलूस, व वसगडे  येथील क्रांती कारखान्याची संचालक संजय पवार,माजी सरपंच श्रेणिक पाटील,धन्यकुमार पाटील, नरसिंह चव्हाण श्री अमोल पाटील,श्री अनिल पाटील, श्री विनोद पाटील, श्री विकास थोरात,श्री रजत पाटील व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.         
       सदर बैठकीमध्ये मोजणी करून जमीन संपादित करणे, ड्रेनेज व्यवस्था, शेतकऱ्यांना शेतात ये - जा करण्यासाठी रस्ता करून देणे व इतर प्रश्न मागण्या दि. १५ नोव्हेंबर पर्यंत मार्गी लावण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले.      सदर मागण्या मान्य झाल्यामुळे .खासदार संजयकाका पाटील व  आ. डॉ. विश्वजीत कदम  यांचे यशस्वी मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला.  त्यामुळे शेतकऱ्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे व शेतकऱ्यांनी खासदार संजयकाका पतील व  आमदार डॉ. कदम यांचे आभार मानले.  
       
खासदारांच्या मुळेअकरा महिन्याचा प्रश्न अकरा दिवसात मिटला.
वसगडेतील शेतकऱ्यांनी ११ महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत खा. संजय काका पाटील यांच्यासमोर रेल्वे बाबतचे प्रश्न मांडले. त्यानंतर संजय काका यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना केल्याने अधिकारी थेट रूळावर पोहचले. काही अंशी मागण्या पूर्ण केल्या, परंतु जमिन  अधिग्रहण, रस्त्याच्या विषया ला  टाळाटाळ सुरू केली.त्यामुळे शेतकऱ्यांना  रेल रोको करावी लागली. यानंतर खा. संजय काका यांनी रेल्वे अधिकारी, शेतकरी यांची बैठक पुणे येथे आयोजन करून शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली लावला. त्यामुळे खासदारांची बुलेट ट्रेन धावली आणि अकरा महिन्याचा प्रश्न अकरा दिवसात मिटला. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केले आहे.


विश्वजीत कदम ही आक्रमक
            या बैठकीदरम्यान भूमी अभिलेख कार्यालय पलूस बाबत सर्वच नेत्यांनी व शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला त्यावर डॉ विश्वजीत कदम यांनी  आयुक्त सौरभ यांच्याशी चर्चा केली  व प्रश्न मार्गी लागला

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆