विटा तहसील कार्यालयासमोर दलित - मुस्लिम अत्याचारा विरोधात तीव्र निदर्शने
======================================
विटा : दि.१८ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय विवेक कांबळे व सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय मस्के यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराविरोधात व महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित मुस्लिम अत्याचारांच्या विरोधात विटा तहसील कार्यालया समोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाच्या विरोधात घोषणा देऊन विट्याचे तहसीलदार उदय गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी दिले.
यावेळी बोलताना आर पी आय चे ज्येष्ठ नेते संजय मस्के यांनी विट्यातील आंबेडकर नगर येथील रेशन दुकानदार तसेच खानापूर तालुक्यातील बऱ्याच गावातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळत नाही तसेच धान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले.त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारात भयंकर वाढ होत असल्याने दलित मुस्लिम समाजात चिंतेचे वातावरण असल्याचे मनोगतात सांगितले.
डीपीआय पक्षाचे संदीप तात्या ठोंबरे यांनीही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आंदोलनास पाठिंबा दिला व महाराष्ट्रामध्ये दलित मुस्लिम सुरक्षित नाहीत असे सावळी मध्ये मुस्लिम समाजाच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शेकडो दलित अत्याचाराच्या घटना घडत आहेत तरीही महाराष्ट्र शासन गांधारीची भूमिका घेत आहे हे निदनिय आहे असे मनोगत व्यक्त करून प्रशासकीय कारभाराबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पलूस- कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तीरमारे , खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली. रिपब्लिकन पक्षाचे लोकसभा उपाध्यक्ष बाळासाहेब झेंडे, युवक आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कांबळे, माजी खानापूर तालुका अध्यक्ष दिनकर धेंडे, आर पी आय आंबेडकर गटाचे खानापूर तालुका अध्यक्ष संदीप लोंढे, मुस्लिम आघाडीचे अध्यक्ष फरीद मनेर, रोजगार आघाडीचे तालुका अध्यक्ष अविनाश बोले, सांगली जिल्हा संघटक दादासाहेब वाघमारे, पलूस कडेगाव विधानसभा उपाध्यक्ष शितल मोरे, विटा शहराध्यक्ष शिवाजी साबळे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆