BANNER

The Janshakti News

लोकनेते स्वर्गीय दत्तू रत्तु खोत (आप्पा) यांच्या तैलचित्राचे मसुचीवाडी ग्रामपंचायत कार्यालयात अनावरण





======================================
======================================

वाळवा : वार्ताहर                      दि.१६ ऑगस्ट २०२३

वाळवा : १५ ऑगष्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, १५ ऑगष्ट रोजी,  मसुचीवाडी (ता.वाळवा) ग्रामपंचायतीचे सलग ३२ वर्ष सरपंच राहिलेले लोकनेते स्वर्गीय दत्तू रत्तु कदम-खोत (आप्पा) यांच्या तैलचित्राचे अनावरण माजी सरपंच सर्जेराव कदम व सरपंच राधिका पाटोळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले

मसुचीवाडी गावातील जडणघडणी मध्ये दत्तू आप्पा यांचे सहकार, कृषी, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय योगदान अमूल्य असे आहे, गावाला यायला रस्ता न्हवता झाडे झुडपे असलेली पायवाट होती, तो ५ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करून घेतला, त्यामुळे गावचे दळणवळण वाढण्यास गती मिळाली, गावातील सार्वजनिक ठिकाणे सुशोभित केली, पिण्यास पाण्याची सोय केली, गावातील व परिसरातील गरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून विद्यालयाची स्थापना केली, टेलिफोन, पोस्ट ऑफिस, पतसंस्था, शेतकरी सेवा सोसायट्या यांची स्थापना करून शेतकऱ्यांच्या अर्थकारणास बळकटी दिली, गावातील सर्व रस्त्याची रचना शहरासारखी केली, अनेक आजारी रुग्णांची सेवा केली, तसेच गावाची ओळख जिल्ह्यात निर्माण केली.




 दत्तू आप्पा यांनी वाळवा पंचायत समितीचे ५ वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले आहे. 
       दत्तू आप्पा यांनी केलेल्या लोकहिताच्या कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून मसुचीवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचयत यांच्या वतीने तैलचित्र अनावरण करण्यात आले.


          यावेळी उपसरपंच संजय कदम, माजी उपसरपंच शांताराम कदम, शंकर कदम(ठाकरे), Advocate संतोष कदम, ग्रामपंचायत सदस्य अमीत कदम, हणमंत गिरी, पूजा माने, अमोल पोपट कदम, राहुल कदम, सुहास पाटील, प्रशांत कदम, विजयसिंह कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम, निवास देशमुख, बापूसो पाटोळे, प्रकाश श्रीरंग माने, वसंत माने ग्रामसेवक गजानन धस्के, तलाठी परमणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆