======================================
======================================
कुंडल : वार्ताहर दि. १६ ऑगस्ट२०२३
स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही यामागे रक्तरंजित असा इतिहास आहे याची जाण आजच्या पिढीला असणे आवश्यक आहे यासाठी असे दिवस हिरीरीने उत्सवारखे साजरे झाले पाहिजेत असे प्रतिपादन डॉ.आशा पाटील यांनी केले.
त्या कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर प्रमुख पाहुण्या म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करताना बोलत होत्या. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, कुंडल परिसर हा स्वातंत्र्याचा ज्वलंत ठिकाण आहे याचं भूमीत स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले त्यामुळे ही भूमी पवित्र आहे. आजच्या पिढीने याचे भान ठेवून कृती करावी.
77 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करताना डॉ.आशाताई पाटील, बाजूस आमदार अरुणअण्णा लाड, अध्यक्ष शरद लाड.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, संचालक अनिल पवार,जितेंद्र पाटील,ऍड.सतीश चौगुले,अंजना सूर्यवंशी,अश्विनी पाटील,सुकुमार पाटील,जयप्रकाश साळुंखे,शीतल बिरनाळे, वैभव पवार, दिलीप थोरबोले,अशोक विभूते, सुभाष वडेर,बाळकृष्ण दिवाणजी,संग्राम जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆