BANNER

The Janshakti News

सुधाकर वायदंडे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान=====================================
=====================================

सांगली | वार्ताहर                        दि. 29 ऑगस्ट 2023

दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते सुधाकर मधुकर वायदंडे यांना सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'आशिया इंटरनॅशनल कल्चर अँड रिसर्च युनिव्हर्सिटी' तर्फे मानद डॉक्टरेट पदवीने गौरव करण्यात आला.
               तामिळनाडू येथे हा कार्यक्रम झाला.या भव्य सोहळ्यात वायदंडे यांना मान्यवरांच्या हस्ते 'मानद डॉक्टरेट' ही पदवी प्रदान करण्यात आली.
           सुधाकर वायदंडे हे आक्रमक व्यक्ती म्हणून परिचित आहेत ते 2006 साली त्यांनी प्रा. मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघात कार्यकर्ता म्हणून कामास सुरवात केली. गेली 17 वर्षे ते सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. ते सध्या दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य आदिवासी पारधी हक्क अभियानाचे काम पाहत आहेत.त्यांनी संघटने मार्फत सर्वसामान्य नागरिकांच्या साठी  राबविण्यात आलेल्या  महागाई विरोधात पुतळा दहन,पेयजल योजनेच्या भ्रष्टाचाराबाबत आंदोलन,महावितरणच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन,अवैध धंद्या विरोधात आंदोलन,ठिय्या आंदोलन,तिरडी मोर्चा, आझाद मैदानावर धडक मोर्चात अग्रभागी राहुन सहभाग नोंदवला आहे.
           याचबरोबर प्रा.वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पारधी समाजाच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी मुंबई, नागपूर, अहमदनगर,औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर याठिकाणी उघडा मोर्चा,धडक मोर्चा,राहुटी आंदोलन,झिंज्या उपड आंदोलन,शंखध्वनी आंदोलन, थाळीनाद आंदोलन,अनेक बेमुदत धरणे आंदोलने करण्यात पुढाकार घेतला आहे.
               एक गांव एक पारधी कुटुंब या योजनेतंर्गत पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे यासाठी सातत्याने ते पाठपुरावा करत असतात.पारधी समाजातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पोलीस प्रशसनाच्या मदतीने त्यानी अनेक उपक्रम राबवलेले आहेत.
अन्याय,अत्याचार विरोधात तसेच सामाजिक प्रश्नावरती अनेक निवेदने देऊन त्यानी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
               संघटनेच्या वतीने थोर  महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम,पारधी समाजासाठी अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम,विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ,फळे वाटपाचे कार्यक्रम  सातत्याने राबवित आहेत.


           दरम्यान सुधाकर वायदंडे म्हणाले,ही पदवी मी माझे वडील दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्रा.मधुकर वायदंडे(सर) व माझी आई मा. केंद्रमुख्याध्यापिका सुनंदा मधुकर वायदंडे यांना अर्पण करतो. 
              वायदंडे सरांनी अत्यंत संघर्षातून केलेल्या बांधणीमुळे दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियान आज तळागाळापर्यंत मजबूत आहे त्यांच्या विचारावर चालत पुढच्या काळात दलित महासंघाच्या माध्यमातून सामाजिक काम करत राहून ज्या नेते,कार्यकर्ते,पदाधिकारी व पारधी समाजाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी सर्वांचा कायम ऋणी राहीन असे वायदंडे यांनी सांगितले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆