======================================
======================================
भिलवडी : वार्ताहर दि. ३० ऑगस्ट २०२३
भिलवडी (ता.पलूस) : भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा, म्हणून भिलवडी पोलीस ठाण्याचे साहा.पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वतीने पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , पदाधिकारी , डॉलबी चालक-मालक , बँड , बँन्जो चालक-मालक , गणेश मूर्तीकार , विक्री करणारे , डिजीटल बोर्ड तयार करणारे , मंडप डेकोरेशन वाले आशा सर्वांची मंगळवार दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत बाळासाहेब काका पाटील सांस्कृतिक भवन हॉल भिलवडी येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली.
सदर बैठकी करिता ५० ते ६० मंडळांचे पदाधिकारी यांच्या सह मूर्तिकार, डिजीटल बॅनर तयार करणारे, डॉल्बी मालक, मंडपवाले असे ऐकून १०० ते ११० जनसमुदाय हजर होता.
यावेळी उत्सवात काय खबरदारी घेणे गरजेचे आहे, यासह अनेक गोष्टींवर साहा.पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सूचना केल्या. तसेच, गणेश मंडळांचे म्हणणेही ऐकून घेतले.
पोलीस ठाणे हद्दीत छोटे-मोठे असे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. प्रत्येक मंडळाचा उत्सव नियमानुसार व शांततेत व्हावा, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. एक गाव एक गणपती , मंडळाच्या अनुषंगाने रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या कमानी , डॉल्बी परवानगी , परस्परांमध्ये सलोखा निर्माण करणारे देखावे , देशभक्ती वाढीला लागेल असे उपक्रम आयोजित करावे तसेच मंडपाजवळ रहदारीला व नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी , विसजर्नाच्या वेळेचे नियोजन करावे , विसर्जन स्थळापासून (विहीर , नदी , तलाव ) महिला-लहान मुलांना तसेच पोहता येत नाही अशांना दूर ठेवावे , प्रत्येक मंडळाने स्वयंसेवक नेमावे , ज्या गणेशोत्सवाचा देखावा पाहण्यासाठी गर्दी अपेक्षित आहे तिथे स्त्री-पुरुषांसाठी वेगळी रांग ठेवा , विसर्जनाच्या मिरवणुकीतील वाहन चांगल्या स्थितीतील ठेवावे , उपदव करणाऱ्या मंडळींना दूर ठेवा अशा सर्व
विषयावर सविस्तर चर्चा होऊन त्यांना सदर विषयाच्या अनुषंगाने शासन परिपत्रकातील योग्य त्या सूचना व मार्गदर्शन साहा.पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले. तसेच त्यांना आपले गावात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दक्ष राहुन बिट अंमलदार यांचेशी समन्वय ठेवण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
यावेळी भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी , गणेश मंडळांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष , प्रतिनिधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपला बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆