BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू हे एक अखंड ऊर्जास्रोत आहे , ...आमदार महादेव जानकर



======================================
======================================

कुंडल : वार्ताहर                            दि. १९ ऑगस्ट २०२३

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू हे एक अखंड ऊर्जास्रोत आहे, त्यांची ती ऊर्जा आजही त्यांच्या स्मारक स्थळातून अनुभवा येते असे प्रतिपादन आमदार महादेव जानकर यांनी केले.

ते जन स्वराज्य यात्रे दरम्यान कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, किरण लाड प्रमुख उपस्थित होते.


आमदार जाणकार म्हणाले, आमच्यावर ही डाव्या विचारसरणीचा पगडा आहे त्यामुळे जनसामान्यांच्या प्रत्येक प्रश्नांसाठी नेहमी रस्त्यावर उतरत आलो आहोत आणि इथून पूढे ही जी.डी. बापूंच्या प्रेरणेने कार्य करत राहू.

आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा विसर पडू नये यासाठी हे स्मारक नेहमी ऊर्जा देत राहील. हे स्मारक पाहण्यासाठी परिसरातील शाळांतून सहली येतात यातून बापूंचे विचार मुलांमध्ये रुजविण्याचे एकमेव उद्दिष्ट या स्मारकातून असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवर्ते, माऊली सलगर, बाळासाहेब लेंगरे, कालिदास गावडे, अजित कटरे, कुंडलिक एडके, प्रकाश पुजारी, अशोक भिसे, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, वैभव पवार, संपत मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆