BANNER

The Janshakti News

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते खटाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन



======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर              दि. 20 ऑगस्ट 2023

 राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र (आप्पा) लाड यांच्या हस्ते खटाव ता.पलूस येथे विविध विकास कामांचे उद्घाटन झाले.
 




 खटाव ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार  खटाव ग्रामपंचायत हद्दीतील रणजीत नागावे घर ते प्रसाद बनाटे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे (आमदार फंड रक्कम - 10 लक्ष रु.) , 
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान बांधणे (रक्कम - 5 लक्ष रु.) इ. विकास कामांचे दि. १८ ऑगस्ट रोजी राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र (आप्पा) लाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि इतर संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचे आभार मानण्यात आले.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆