BANNER

The Janshakti News

भिलवडी गावचे माजी सरपंच निजाम ढालाईत यांचे निधनकाँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, भिलवडीच्या राजकारणातील एक अभ्यासू व आदरणीय व्यक्तिमत्व हरपले

=====================================
=====================================भिलवडी : वार्ताहर                       दि. ५ ऑगस्ट २०२३


पलूस तालुक्यातील भिलवडी गावचे सुपुत्र,काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व भिलवडी गावचे माजी सरपंच, भिलवडीच्या राजकारणातील एक अभ्यासू व आदरणीय व्यक्तिमत्व निजाम कबीर ढालाईत यांचे शनिवार दि.५ ऑगस्ट रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले ते ९६ वर्षांचे होते.
 शनिवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ.वसंत दादा पाटील, माजी मंत्री स्व.डॉ.पतंगराव कदम, माजी मंत्री स्व.आर.आर.पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. 
 भिलवडी व परीसरात काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी स्व.बाळासाहेब काका पाटील यांच्या सोबत स्व. निजाम ढालाईत यांंनी  भरपूर मेहनत घेतली होती.
 

जियारत / रक्षाविसर्जन ---
सोमवार दि.७ ऑगस्ट रोजी 
सकाळी १०:०० वाजता 

मुस्लिम दफन भूमी भिलवडी येथे होणार आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆