BANNER

The Janshakti News

१ कोटी २० लाख रुपये किंमतीचा गांजा मुद्देमाल जाळून नाश ...सांगली पोलीस दलाची कारवाई


              SANGLI | POLICE

======================================
======================================

सांगली : वार्ताहर                                 ५ ऑगस्ट २०२३

सांगली जिल्हा पोलीस दलाकडुन जिल्हयातील ११ पोलीस ठाणेमधील वेगवेगळया ४५ गुन्हयातील १ कोटी २० लाख रुपये किंमतीचा गांजा मुद्देमाल जाळून नाश करण्यात आला आहे.
 अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे यांनी दिली आहे.

सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळया ११ पोलीस ठाणेकडील एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ प्रमाणे लागवड, वाहतुक, विक्री, सेवन अशा वेगवेगळया दाखल असलेल्या गुन्हयातील सन १९९८ पासून ते सन २०२२ पर्यतचा  मुद्देमाल हा एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ मधील तरतुदीनुसार केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊन मध्ये पोलीस ठाणेकडून जमा करण्यात आलेला होता. डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याबाबत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायदयातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरु करणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने पोलीस मुख्यालय, सांगली येथील केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊन मध्ये जमा असलेला मुद्देमालाबाबत मा. न्यायालयात व पोलीस ठाणेस पाठपुरावा करून वेगवेगळया ११ पोलीस ठाणेकडील ४५ गुन्हयातील मुद्देमाल नाश करणे बाबत आदेश प्राप्त करून घेतले. तसेच मा. पोलीस महासंचालक, दशहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई., सीआयडी, पुणे व विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमली पदार्थ मुद्देमाल नाश बाबत परवानगी घेवून तसेच त्याबाबतच्या शासन निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्हयात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी ( अध्यक्ष मा. पोलीस अधीक्षक सांगली, सदस्य मा. अपर पोलीस अधीक्षक, सांगली, सदस्य मा. पोलीस उप अधीक्षक, गृह, सांगली) स्थापन केली. सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊन मध्ये पोलीस ठाणेकडून जमा करण्यात आलेला गांजा मुद्देमाल हा एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ मधील कलम ५२ (अ) या प्रमाणे  दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी चितळे उदयोग समुह, भिलवडी येथे असलेल्या वुड फायर बॉयलर मध्ये  बॉयलरमध्ये नाश करणेत आला.


सदर नाश प्रक्रियेमध्ये सांगली जिल्हयातील जत पोलीस ठाणेकडील १३ गुन्हयातील, उमदी पोलीस ठाणेकडील ०५ गुन्हयातील, मिरज शहर पोलीस ठाणेकडील ०६ गुन्हयातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील ०५ गुन्हयातील, सांगली शहर पोलीस ठाणेकडील, ०७ गुन्हयातील, सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील ०२ गुन्हयातील, विटा पोलीस ठाणेकडील ०३ गुन्हयातील, कासेगांव पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हयातील, तासगांव पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हयातील, कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हयातील, मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हयातील अशा वेगवेगळया ११ पोलीस ठाणेकडील एन. डी. पी. एस. ॲक्ट १९८५ प्रमाणे लागवड, वाहतुक, विक्री, सेवन अशा | वेगवेगळया दाखल असलेल्या वेगवेगळया ४५ गुन्हयातील सदरचा १२०५.३२२ किलोग्रॅम वजनाचा चालु दराप्रमाणे १ कोटी २० लाख रुपये किंमतीचा गांजा मुद्देमालाचा समावेश होता.


सदर प्रकिया एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ मधील कलम ५२ (अ) प्रमाणे दोन शासकीय पंचासमक्ष व कमिटी अध्यक्ष, सदस्य यांचेसमक्ष सुरक्षितरित्या कोणत्याही प्रकारचे प्रदुषण व त्यामुळे आजुबाजूचे परीसरातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेवून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. 

सदर प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता 

 मा. पोलीस अधीक्षक तथा अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी अध्यक्ष डॉ. बसवराज तेली यांचे मार्गदर्शनाखाली सदस्य-  तुषार पाटील, अपर पोलीस अधीक्षक, अरविंद बोडके,  पोलीस उप अधीक्षक, गृह, सांगली  सचीन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगांव विभाग,  श्री. सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्था. गु.अ. शाखा, वर्षा पाटील, सहा. रासायनिक विश्लेषक, कोल्हापूर विभाग. सपोनि. नितीन सांवत, भिलवडी पोलीस ठाणे,  सपोनि. पंकज पवार, स्था. गु.अ. शाखा,  पोहेकॉ. सुधीर गोरे, एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पो.हे.कॉ. अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, मच्छींद्र बर्डे, कुबेर खोत, अरुण पाटील, शुभांगी मुळीक, राजु शिरोळकर, पोकॉ. सोमनाथ पतंगे, अजय बेंद्रे, संतोष अकोळकर, निरीक्षक, शास्त्र सहायक वैध मापन शास्त्र, तासगांव विभाग, सांगली.  उदय कोळी, निरीक्षक, शास्त्र सहायक वैध मापन शास्त्र, सांगली विभाग, सांगली.
 रोहिदास मतकर, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय, सांगली पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.
 सदर पुर्ण प्रकियेत चितळे उद्योग समुह यांचेकडील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभल्याने मा. पोलीस अधीक्षक, सांगली डॉ. बसवराज तेली यांनी चितळे उदयोग समुहाचे आभार मानले आहेत.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆