BANNER

The Janshakti News

मुस्लिम, बहुजन समाजावर वाढत्या अत्याचाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली येथे ११ जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन...

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संपर्कप्रमुख नझीरहुसेन झारी यांनी दिली माहिती...

======================================
======================================


सांगली : वार्ताहर                 दि. ९ जुलै २०२३

सांगली : संपूर्ण देशात आणि राज्यात मुस्लिम व बहुजन समाजावर अत्याचाराच्या घटना वाढत असून मुस्लिम, बहुजन समाजाला जाणीवपूर्वक जातीयवादी शक्तिकडून लक्ष्य केले जात आहे त्याच्या निषेधार्थ मंगळवार दि. ११ जुलै २०२३ रोजी महात्मा गांधी पुतळा ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा या ठिकाण पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नझिरहूसेन झारी यांनी दिली.


मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील परळीमध्ये मुस्लिम समाजातील जरीन खान या युवकाचा पोलिस मारहाणीत मृत्यू झालेला आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील युवकाचा पोलिस कस्टडी मध्ये मृत्यू झाला आहे. नांदेड या ठिकाणी अक्षय भालेराव याचा निर्घृण खून करण्यात आला त्याच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी वंचित बहुजन आघाडी मागणी करीत आहे. त्याचप्रमाणे जातीवादी समाजकंटकांकडून मुस्लिम कुटुंबावर हल्ले होताना दिसत आहेत. तरी मुस्लिम बहुजन समाजावर होत असलेले हल्ले थांबले पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. 

आद. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशअध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथे महात्मा गांधी पुतळा ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सांगली या ठिकाण पर्यंत मंगळवार दि. ११ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे हे करणार आहेत. सर्व मुस्लिम बहुजन समाजातील लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नझीर हुसेन झारी यांनी केले आहे. यावेळी चंद्रकांत खरात, रहीम कवठेकर, परवेज इनामदार, मोहमद केडीया, मानतेश कांबळे, चंद्रकांत कोलप, दीपक कांबळे, अनिल सावंत, प्रमोद मल्लाडे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले आदी उपस्थित होते.




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆