BANNER

The Janshakti News

सौ. छाया गायकवाड यांनी आपल्या सेवाकाळात सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविले ...विश्वास चितळे



==============================
======================================

भिलवडी : प्रतिनिधी    दि. ०९ जुलै २०२३

 भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेमधील सहाय्यक शिक्षिका सौ. छाया सुभाष गायकवाड यांनी भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृमहोत्सवा निमित्त संस्थेस ७५ हजार रुपयाची देणगी दिली.भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. 
भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे अध्यक्षस्थानी होते.
भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  विश्वास चितळे यांच्या हस्ते  सन्मानपत्र,शाल,श्रीफळ,चांदीची गणेश मूर्ती देऊन,पोषाख देऊन सौ. छाया गायकवाड व सुभाष गायकवाड या दांपत्याचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,संचालक डी. के.किणीकर,संजय कदम,संस्थेचे सचिव मानसिंग हाके, भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.विद्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारा शिल्पकार आहे.सौ. छाया गायकवाड यांनी आपल्या सेवाकाळात सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविले असून खाजगी मराठी प्राथमिक शाळेच्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वपूर्ण असे योगदान असल्याचे प्रतिपादन  विश्वास चितळे यांनी केले. 


सौ. छाया गायकवाड  यांनी गेल्या ३५ वर्षात केलेल्या शैक्षणिक सेवा कलातील अनुभवांचे  कथन केले. आईने वडिलांचे संस्कार, यशस्वी होण्यासाठी दिलेला कानमंत्र
,कुटुंबीयांची साथ,भिलवडी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी,विद्यार्थी,पालक यांचे मिळालेले सहकार्य यामुळे सेवा काळ उत्तमपणे पार पडला असल्याचे मनोगत व्यक्त केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त ७५ हजार रुपयांच्या धनादेश संस्थेचे अध्यक्ष  विश्वास चितळे यांचे कडे सुपूर्द केला. 
संस्था सचिव मानसिंग हाके यांनी प्रास्ताविक केले.मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी आभार मानले.प्रगती भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर शरद जाधव यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.विद्यालयाचे पालक प्रमोद कुलकर्णी, शिक्षक संजय पाटील, माजी मुख्याध्यापिका सौ. अनिता रांजणे,सेकंडरी स्कूल भिलवडी चे माजी मुख्याध्यापक बी. एन. मगदूम  यांनी आपल्या  मनोगतामधून सौ. छाया गायकवाड यांनी केलेल्या  शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
ग्रामपंचायत सदस्या सीमा शेटे, मुख्याध्यापक संजय मोरे,महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे, महावीर शेडबाळे, श्री. शशिकांत उंडे, सौ. उमा कोरे,प्रा. व्ही. एस.यादव,विद्या टोणपे,स्मिता माने,प्रतिभा पवार,भिलवडी परिसरातील महिला, पालक, ग्रामस्थ,शिक्षक बंधू भगिनी, गायकवाड कुटुंबीय नातेवाईक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ.छाया गायकवाड व सुभाष गायकवाड यांनी देणगीचा धनादेश विश्वास चितळे यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी डॉ.बाळासाहेब चोपडे,मानसिंग हाके, सौ.विद्या पाटील, संजय कदम,सुकुमार किणीकर  आदी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆