BANNER

The Janshakti News

विश्वास चितळे यांची भिलवडी शिक्षण संस्थेस तीन लाख रुपयांची देणगी
======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                        दि. २७ जुलै २०२३

भिलवडी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष,चितळे उद्योग समूहाचे पार्टनर उद्योगपती  विश्वास चितळे यांनी
भिलवडी शिक्षण संस्थेस तीन लाख रुपयांची देणगी दिली.
 भिलवडी शिक्षण संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष व आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही देणगी दिली आहे. आपल्या जनमदिनाच्या निमित्ताने भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी देण्याची परंपरा चितळे परिवाराने निर्माण केली आहे.
विश्वास चितळे यांनी तीन लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे  यांचेकडे सूपुर्द केला.

भिलवडी शिक्षण संस्थेमधील विविध विकासकामांसाठी तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा वापर करावा असे मनोगत विश्वास चितळे यांनी व्यक्त केले.

सचिव मानसिंग हाके यांनी विश्वास चितळे आणि परिवाराचे संस्थेस दिलेल्या देणगी बद्दल भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आभार मानले. डॉ.बाळासाहेब चोपडे यांच्या हस्ते बुके देऊन विश्वास चितळे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी उद्योजक श्रीपाद चितळे, गिरीश चितळे, सौ.अंजली चितळे, अदिती चितळे,पुष्कर चितळे,निखिल चितळे, भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.सुनील वाळवेकर,संजय कदम, जयंत केळकर,व्यंकोजी जाधव, सचिव मानसिंग हाके,के.डी.पाटील, प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,विजय तेली, सौ.मनीषा पाटील, सुकुमार किणीकर, विद्या टोणपे आदी उपस्थित होते.

विश्वास चितळे यांनी देणगीचा धनादेश डॉ.बाळासाहेबचोपडे यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी श्रीपाद चितळे,गिरीश चितळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆