BANNER

The Janshakti News

राजकारण - समाजकारणातील आधारवड हरपला..======================================
======================================


भिलवडी : जि.सांगली दि. २९ जुलै २०२३

माळवाडी : पलूस तालुक्यातील माळवाडी (भिलवडी) गावचे जेष्ठ नेते , तासगाव पंचायत समिती माजी सदस्य , माळवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच , विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष आदरणीय
श्री. नामदेव कृष्णाजी तावदर (अण्णा) यांचे काल शुक्रवार दि.२८/०७/२०२३ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी माळवाडी येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
शुक्रवार दि. २८ रोजी रात्री ११:०० वाजता भिलवडी येथे कृष्णा नदीच्या ऐतिहासिक घाटावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार विधी करण्यात आला.
त्यांच्या पश्चात दोन मुले , तीन मुली व सुना नातवंडे असा परीवार आहे.


नामदेव कृष्णाजी तावदर उर्फ आण्णा यांच्या जाण्याने संपूर्ण माळवाडीच्या राजकारण- समाजकारणातील आधारवड हरपला आहे, या शब्दात संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

समाजकारण या एकाच तत्त्वाने, एकाच ध्येयाने संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेले आण्णा सर्वांसाठीच एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांच्या सर्वांशी मिळून मिसळून राहण्याच्या, आदर्शवादी स्वभावामुळे काँग्रेस पक्षातून तासगाव पंचायत समितीवर व माळवाडी ग्रामपंचायतवर निवडून आले होते. सरपंच , तंटामुक्त अध्यक्ष व पॅनेल प्रमुख म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे नामदेव तावदर हे माळवाडी गावच्या राजकारणात एक आदरणीय व्यक्तिमत्व होते.

गावच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. साधारण तीन ते चार पिढ्यातील मतदारांशी नाळ जोडून असणारे नामदेव तावदर हे साधी राहणी,उच्च विचार,स्वच्छ प्रतिमा,स्वच्छ चारित्र्य, वैचारिक ध्येयनिष्ठा यासाठी चिरपरिचित होते. सन १९६६ पासून गावाला विकासाच्या उत्तुंग शिखरावर नेण्यात आण्णांचे कष्ट कधीही विसरले जाऊ शकत नाही. आण्णांनी माळवाडी गावासाठी ४० वर्षाहून जास्त काळ दिलेले योगदान हे अविस्मरणीय आहे.
त्यांच्या जाण्याने माळवाडी गावाची मोठी हानी झाली आहे.

रक्षाविसर्जन ----

रविवार दि. ३० / ०७ / २०२३  रोजी 
सकाळी ०९:३० वाजता 
कृष्णा घाट भिलवडी येथे होणार आहे.


स्वर्गीय नामदेव कृष्णाजी तावदर उर्फ आण्णा यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या जाण्याचे दुःख पचविण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना..

शोकाकुल --

              सौ. राणी भाऊसाहेब रुपटक्के.
   मा.ग्रामपंचायत सदस्या-माळवाडी
 
              श्री. अमरजित लक्ष्मण मोहिते.
  भक्ती डोअर लॅमिनेशन अँण्ड स्लायडिंग विंन्डोज फर्निचर , माळवाडी

              श्री. संजय भिमराव जाधव.
 ग्रामपंचायत मा.सदस्य , माळवाडी

              श्री. प्रताप आनंदा पुजारी.
 सामाजिक कार्यकर्ते , माळवाडी

              श्री. ऋषीभैया टकले.
 उद्योजक बाँम्बे स्टिल , आष्टा
   
              श्री. बाळकृष्ण शंकर जाधव.
  मा. सरपंच माळवाडी

             श्री. मनेश रामचंद्र मोरे 
 मा.ग्रामपंचायत सदस्य, माळवाडी

            श्री. राजेंद्र अशोक रुपटक्के.
राष्ट्रवादी काँग्रेस , शरदभाऊ भाऊ लाड कट्टर समर्थक, माळवाडी

             श्री. सचिन युवराज टकले.
' द जनशक्ती न्यूज ' कार्यकारी संपादक , माळवाडी

           श्री. इनामुलहक्क शब्बीर सुतार, 
सामाजिक कार्यकर्ते, माळवाडी

" मा.ऋषीभैया टकले युथ फाऊंडेशन " माळवाडी

" स्व.गजानन भाऊ मोहिते युथ फाऊंडेशन " माळवाडी

" शंभुराजे युथ फाऊंडेशन" माळवाडी
 
 " समस्त ग्रामस्थ माळवाडी ता.पलूस "
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆