BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सह. साखर कारखाण्‍याच्‍या सन २०२३-२४ च्‍या २२ व्‍या गाळप हंगामामध्‍ये १२ लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्‍याचे उद्दिष्‍ट...अध्‍यक्ष आमदार अरुणअण्‍णा लाड



======================================
======================================

कुंडल : वार्ताहर                दि. ०८ जुलै २०२३

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाण्‍याच्‍या सन २०२३-२४ च्‍या २२ व्‍या गाळप हंगामामध्‍ये १२ लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्‍याचे उद्दिष्‍ट आहे, यासाठी कारखाण्‍याची सर्व यंत्रणा सज्‍ज आहे असे प्रतिपादन कारखाण्‍याचे अध्‍यक्ष आमदार अरुणअण्‍णा लाड यांनी केले.

ते क्रांती कारखान्याच्या गाळप हंगामाच्‍या मिल रोलर पुजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेचे माजी सदस्‍य शरद लाड,
क्रांती दूध संघाचे अध्‍यक्ष किरण लाड प्रमुख उपस्थित होते.


आमदार अरुण लाड म्‍हणाले, यावर्षी पाऊसमान आणि परिसरातील योजनांच्या पाण्याचा पुरवठा चांगला असल्याने उसाचे पीक चांगले आहे. नोंदवलेल्या संपूर्ण ऊसाचे गळीत करण्यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण ५००० मे टनावरून ७५०० मे टन प्रति दिन पूर्ण झाले आहे. गत वर्षीपासून केंद्र शासनाच्या धोरणाने इंधनाची गरज लक्षात घेवून सिरप पासून इथेनॉल निर्मिती करून देशाची इंधनाची गरज भागविण्यासाठी हातभार लावण्याचे काम सुरू केले आहे.

यावर्षीपासून कारखाना ९००० प्रति मे टनाने प्रतिदिन ऊस गाळप होईल. त्यामुळे ऊस तोडणीमध्ये अजूनही सुसूत्रता येवून संपूर्ण ऊस वेळेत गळीत होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पेट्रोलीयम कंपन्‍यांनी कारखान्‍याकडून इथेनॉल खरेदी वेळच्या वेळी करून त्यातील टँकर खाली करण्यासाठी होणारी दिरंगाई टाळणेसाठी शासनाकडून ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

कारखाण्‍याकडे सध्‍य स्थितीला १४ हजार ५८० हेक्‍टर ऊस नोंद आहे यातून १२ लाख मे.टन गळापाचे उद्दिष्‍ट ठेवले आहे. त्यादृष्टीने कारखान्‍याची अंतर्गत कामे पुर्ण झाली आहेत. ऊस तोडणी वाहतूकीचे करार झाले आहेत तसेच मजुरांनाही ॲडव्हान्स दिलेले आहेत.





कारखाना कार्यक्षेत्रातील जास्‍तीत जास्‍त क्षेत्र ठिबक सिंचनखाली आणणेसाठी आम्‍ही प्रयत्‍नशिल आहोत. परिसरातील इतर कारखान्‍यांच्‍या बरोबरीने आपण ऊसाला दर दिला आहे आणि यापुढे हि देऊ. तरी शेतक-यांनी आपल्‍या नोंद क्षेत्रातील जास्‍तीत जास्‍त ऊस कारखान्‍याकडे गाळपासाठी पाठवावा असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.

यावेळी महेंद्र करांडे, प्रशांत पवार, विराज पवार, जगदीश महाडिक, हेमंत मोरे, सुरेश पाटील(सासपडे), प्रवीण करडे,सुरेश शिंगटे, जिल्हा परिषद माजी सदस्य नितीन नवले, नितीन लाड, धोंडीराम शिंदे, अर्जुन कुंभार, जगन्नाथ आवटे, गोविंद डुबल, संचालक दिलीप थोरबोले, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, सुकुमार पाटील, वैभव पवार, ऍड.सतीश चौगुले, संजय पवार, शीतल बिरनाळे, प्रभाकर माळी, भगवंत पाटील, अविनाश माळी, रामचंद्र देशमुख, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, बाळकृष्ण दिवानजी, अश्विनी पाटील, अंजना सूर्यवंशी, अशोक विभूते, सुभाष वडेर कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्‍हाणे, ग्रामपंचायत सर्व सदस्‍य, क्रांती करखान्‍याचे सर्व संचालक, यांचेसह कर्मचारी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



https://youtube.com/@thejanshakatinews5707

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆