BANNER

The Janshakti News

पलूस नवोदय मध्ये खो-खोच्या स्पर्धेस प्रारंभ माजी सभापती दीपक मोहिते यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

=====================================
=====================================

पलूस : वार्ताहर              दि. ०८ जुलै २०२३

पलूस : नवोदय विद्यालय पलूस येथे पुणे क्लस्टर मधील एकूण आठ नवोदय  विद्यालयातील विद्यार्थी यांचा खो खो च्या स्पर्धांचा प्रारंभ आज माजी सभापती दीपक मोहिते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला .यावेळी माजी सभापती दीपक मोहिते तसेच पलूस नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुनील  कुमार नल्लत यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .यावेळी बोलताना प्राचार्य सुनील कुमार नल्लत म्हणाले पुणे क्लस्टर मधील विद्यालयातील संघांचा समावेश येथे खो-खोच्या स्पर्धा करिता झालेला आहे .गोवा , सातारा ,कोल्हापूर ,सांगली ,रत्नागिरी,सिंधुदुर्ग येथील एकूण आठ संघ दाखल झाले असून त्यांची सर्व व्यवस्था पलूस येथील नवोदय विद्यालयामध्ये करण्यात आली आहे. 


दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ज्यांचा संघ विजेता होईल तो पुढे अमरावती येथे होणाऱ्या रिजनल स्पर्धेकरिता निवडला जाणार आहे. अमरावती येथे सर्व क्लस्टर मधून विजेते असणारे खोखो टीमचे संघ एकत्रित येऊन त्यांच्या स्पर्धा होणार आहेत. तिथे गुजरात,गोवा आणि महाराष्ट्र इथून संघ उपस्थित होणार आहेत. त्यातून विजेता उपविजेता खो खो ची टीम घोषित करण्यात येणार आहे.आता सुरू असलेल्या  स्पर्धेची सर्व तयारी पलूस विद्यालयाने केली आहे. पलूस येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो.असेही प्राचार्य सुनीलकुमार म्हणाले. यावेळी दीपक मोहिते प्राचार्य सुनील कुमार नलत,पूर्वा जोशी, कीर्ती देसाई ,केजी कांबळे, गोपाल चोपडे, बी. डी. सूर्यवंशी, डी.बी. भावसार व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆